these demands of sumantai patil Rohit Patil strike water issue of 19 villages in sangli marathi news sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

टेंभूच्या विस्तारित योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी ,या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे.

Ajinkya Dhayagude

- अजिंक्य धायगुडे

सांगली - सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आणि पाण्यापासून वंचित असलेल्या १९ गावासाठी स्व . आर.आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील आणि पुत्र रोहित पाटील यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

टेंभूच्या विस्तारित योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी ,या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या एक दिवस अगोदर म्हणजे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला मान्यता दिलेले पत्र आमदार अनिल बाबर यांच्याकडे सुपूर्द केले.

या उपोषणाचे मुख्य कारण तासगाव तालुक्यातील १० गावे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ९ अश्या दोन्ही तालूक्यातील मिळून १९ गावांसाठी टेंभू योजनेच्या सुधारित प्रस्तावामध्ये या गावाचा समावेश करावा. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता रखडल्याचे आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडून अनिल बाबर यांच्याकडे सुपूर्द केलेल्या पात्रात विस्तारित योजनेत आठ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे . परंतु प्रत्यक्षात कामाला सुरूवात होत नाही, आणि तसे लेखी पत्र मिळत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही, असे आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT