corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी तालुक्‍यातील ही गावे अकरा दिवस बंद राहणार

सकाळवृत्तसेवा

खरसुंडी (सांगली)- आटपाडी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रत्येक गावात नागरिकांची धाकधूक वाढली.पश्चिम भागातील प्रमुख खरसुंडी,नेलकरंजी व इतरही लहान गावे उद्यापासून अकरा दिवस पूर्ण बंद राहणार आहेत.बंद मध्ये कोणतेच व्यवसाय सुरु राहणार नाहीत असा निर्णय ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एक मताने घेतला आहे.यामुळे पश्चिम भागात पूर्ण शुकशुकाट राहणार आहे.


आटपाडी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव या आठवड्यात झाल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावांमधील नागरिक पूर्ण भीतीच्या छायेखाली आली आहेत.तालुक्यातील प्रत्येक गावात राज्य व राज्याबाहेरील शहरांमधून नागरिक मोठ्या संख्येने तालुक्यातील गावात आली आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायत व वैद्यकीय खाते चक्रावून गेली आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या गावातून नागरिक गावात येतच आहेत. बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने व येणाऱ्या मधूनच कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने प्रत्येक गावातील ग्रामपंचायत व नागरिकांनी गांभीर्याने दखल घेऊन गावचे संरक्षण करण्यात सुरुवात केली आहे.


तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील मुख्य खरसुंडी व नेलकरंजी आणि इतरही काही गावांनी 21 मेपासून 31 मे पर्यंत पूर्णता सर्व व्यवसाय बंद करून गावे बंद ठेवण्यात येणार आहेत.ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सर्वांनुमते कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा 11 दिवसाचा बंदचा निर्णय घेतला आहे.या बंदच्या कालावधीत फक्त दवाखाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.इतर कोणतेही व्यवसाय सुरू राहणार नाहीत.दवाखाने सोडता इतर अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.कोरोना संसर्गाची साखळी वाढू नये यासाठी प्रखर असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर गावातील अंतर्गत रस्ते ही पूर्णता इतरांसाठी बंद करण्यात आली आहेत.उद्यापासून पश्‍चिम भागातील प्रत्येक गावात रस्त्यावर व गाव भागात पूर्णतः शुकशुकाट दिसणार आहे.


खरसुंडी व परिसरातील गावांनी या महिन्यात हा बंद चा दुसरा निर्णय सर्वात मोठा घेतला आहे.दिनांक 21 मे पासूनअकरा दिवस सर्व व्यवसाय बंद राहणार असल्याने पश्चिम भागातील नागरिकांनी आज किराणा व इतर जरुरी साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.उद्यापासून कोणासच काही मिळणार नाही.औषधे दुकाने ही ठराविक सुरू ठेवण्यात येणार आहेत.सर्वच औषध दुकानदारांना अत्यावश्यक सेवाखाली परवानगी दिली गेली नाही.अशाप्रकारे पूर्णता कडकडीत गावे बंद राहणार आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार श्रीनाथांचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.या बंद कालावधीत कोणीही भाविक भक्तांनी दर्शनाकरिता येऊ नये सहकार्य करावे.

-चंद्रकांत पुजारी, अध्यक्ष-श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT