they became the security guards of the village and the messenger of cleanliness 
पश्चिम महाराष्ट्र

ते बनले गावचे रक्षक आणि स्वच्छता दूत

शिवाजीराव चौगुले

शिराळा : मणदूर (ता. शिराळा, जि. सांगली ) येथे कोरोनाच्या लढाईसाठी तरुण मंडळे गावचे रक्षक व स्वच्छता दूत बनले आहेत. त्यांचा आदर्श इतर गावातील विविध मंडळांनी घेतला तर आपण कोरोनला सहज हरवू शकतो. 

चांदोली धरणाजवळ मणदूर हे गाव. या गावात सार्वजनिक कामांसाठी येथील गणेश मंडळे नेहमीच अग्रेसर असतात. गावोगावी गणेशोत्सव, दुर्गाउत्सव, नाग मंडळे व युवा मंडळे असतात. त्या माध्यमातून विविध सण व उत्सव साजरे केले जातात. त्यासाठी काहीवेळा अनाठायी खर्च ही केला जातो.

गावातच एकमेकांच्या कार्यक्रमासाठी चढाओढ असते. त्यात आपलेच मंडळ सरस असावे असे प्रत्येकाचे मत असते. पण आपल्या गावावर संकट आले तर त्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून आपण एकच आहोत हे समजून एकत्र येणारी काही मंडळे असतात. त्या पैकीच एक मणदूर येथील 
गणेश मंडळ, नव तरुण गणेश मंडळ, जनता राजा गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, मंगलमूर्ती गणेश मंडळ, शेवताईदेवी गणेश मंडळ, भगवे वादळ प्रतिष्ठान, शिवराज मंडळ, न्यु परिवर्तन मंडळ ही मंडळे आहेत. सर्वत्र कोरोनाचे संकट असल्याने आपल्या गावाची सुरक्षितता आपल्या खांद्यावर या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. 

त्यांनी गेट तयार करून गावच्या चारी बाजूचे रस्ते बंद केले आहेत. त्या चारी कोपऱ्यावर प्रत्येक मंडळाचे पाच कार्यकर्ते आपल्या सोयीनुसार रात्रंदिवस खडा पहारा देत आहे. गावात भाजीपाला टंचाई भासू नये म्हणून भाजीविक्रीसाठी गावातील व्यक्तीलाच परवानगी दिली आहे. दूध गाडी गेटच्या बाहेर ठेवून गावातून दूध त्या ठिकाणी घातले जात आहे. मंडळाचे कार्यकर्ते एवढ्यावर न थांबता व ग्रामपंचायतवर अवलंबून न रहाता मंडळामार्फत गावची स्वच्छता करत आहेत. गावच्या एकीने गावात बाहेरून येणाऱ्यांना ही धास्ती वाटत आहे. हा लॉक डाऊन कोरोना हद्दपार होऊ पर्यंत रहाणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT