3Corona_Danger_4.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ते विदेशातून आलेत, पण

सकाळवृत्तसेवा

 
सांगली ः कोरोनाग्रस्त देशातून आतापर्यंत भारतात परतलेल्या नागरिकांचे विमानतळावरच योग्य ते प्रतिबंधात्मक उपचार केले जातात. त्यानंतर संबंधित जिल्ह्यात कळविले जाते. ते विदेशातून आलेत, कोरोनाग्रस्त नाहीत. सांगलीकरांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे. 


कोरोना बाधित रुग्णांचे सांगलीत परतल्याचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

डॉ. साळुंखे यांना विचारणा करण्यात आली. ते म्हणाले,""या पत्रात उल्लेखलेल्या व्यक्ती या रुग्ण नाहीत. त्यांची विमानतळावर राज्य शासनाच्या प्राधिकृत वैद्यकीय पथकाकडून रितसर तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची खातरजमा करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यातील हे प्रवासी असतील त्या जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांना संचालक आरोग्य सेवा यांनी पत्राद्वारे संबंधित नावे कळवली जातात.

त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील यादी आपल्याला कळवणेत आली आहे. या व्यक्ती महापालिका क्षेत्रातील असतील, तर संबंधित प्रशासनास कळवले जाते. ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कळवले जाते. जेणेकरून या प्रवाशांचा पत्ता व संपर्क क्रमांक घेऊन त्यांना जर काही त्रास वाटला तर सेवा देण्यास आरोग्य विभागाला सोयीचे जाते. आजतागायत कोरोनाचा एकही रुग्ण सांगलीत आलेला नाही. रुग्णालयात दाखल केलेला नाही. अफवांवर विश्‍वास ठेवू नये.'' 

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेतील चर्चेत कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. परदेशातून येणाऱ्यांचे विमानतळावर स्कॅनिंग केले जाते. त्यांची तपासणी करूनच त्यांना त्यांच्या गावी पाठविले जाते. अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्यावर विश्‍वास ठेवू नये. पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मंत्री टोपे यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT