wine 
पश्चिम महाराष्ट्र

अन्‌ त्यांचा विश्‍वासघात झाला..!

सकाळवृत्तसेवा

सांगली ः आज ते भल्या पहाटे उठले. विधी आवरले. आंघोळ करून आधी गाव गाठले. इकडे-तिकडे नजर टाकली आणि नीटघोल त्यांनी रस्ता धरला. हा रस्ता त्यांच्या अत्यंत परिचयाचा. त्यांच्या पावलांनीच मळलेला. अलिकडे त्या रस्त्यावर धूळ बसलेली. ती धूळ उडवत त्यांची पावले तो रस्ता तुडवू लागली.


24 मार्चपासून या क्षणाची प्रतिक्षा होती. तो दिवस कधी उजाडेल असे झाले होते. आज तो उजाडणार हे कालच जाहीर झाले होते. तसे जाहीर करणारे कुणी साधेसुधे नव्हते. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, जिल्ह्याचे कलेक्‍टर होते. आता त्यांनी सांगितलं आहे म्हटल्यावर सकाळ सकाळी शटर उघडलं असणारच, हा विश्‍वास घेऊन त्यांची पावले झपाझप पुढे सरकू लागली. एक वळण घेतले अन्‌ दुकानापुढे जावून वर नजर केली. त्या क्षणाला काळजाचा ठोका चुकला होता... समोरचे चित्र पाहून झोप उडाली होती. कारण, भ्रमनिराशाच झाली होती.


हे ठिकाण होतं, शहरातल्या, गावच्या दारू दुकानाचं. हे दुकानं देशीचं होतं, विदेशीचं होतं... आज इथं दारु मिळणार, असं ठरलेलं असताना हे कसं झालं? दुकान का नाही उघडलं, या प्रश्‍नाने मग साऱ्यांना भंडावून सोडलं. कुणी म्हणाला, बहुतेक दुकानदाराला लवकर उठायची सवय आता मोडली असेल. थोडं थांबूया... सारे थांबले.

काही वेळ वाट पाहिली. तरी गडी येईना. मग फोन केला... तर तो उचलेना. त्यालाही माहिती होते, अफाट गर्दी झाली असणार. बॉक्‍सच्या बॉक्‍स रिकामे होणार. आज पुन्हा लक्ष्मी खुळखुळणार. गल्ला फुल्ल होणार. पण, त्यासाठी एक कागद हवाय. तो कागदच अजून आला नाही. सांगली जिल्ह्यात हे घडले. दारू दुकाने सुरु करण्याबाबतचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आदेश मिळालेलेच नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT