पश्चिम महाराष्ट्र

घरदार, बाग गेली, दमडी नाही मिळाली; काय आहे प्रकार

सकाळवृत्तसेवा

झरे: घरनिकी (ता. आटपाडी, जि. सांगली) हद्दीतून टेंभू योजनेचा डावा कालवा गेला आहे. कालव्यात अनेकांच्या जमिनी गेल्यात. त्यांना भरपाई मिळण्यासाठी कृषी उप विभागीय कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे, अशी तक्रार आहे. 

याबाबतची माहिती अशी, की टेंभूचा आटपाडी डावा कालवा घरनिकी हद्दीतून गेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. मोहन विठोबा पवार यांचीही जमीन गेली. घर, शौचालय, बायोगॅस व डाळिंबाची बाग कालव्यात जाऊन नुकसान झाले. अतोनात नुकसान झाले. भरपाईसाठी टेंभू कार्यालयाकडून कृषी विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानुसार सन 2012 मध्ये मूल्यांकन झाले. कृषी विभागाच्या आटपाडी कार्यालयाने त्याचा प्रस्ताव तयार करून विटा येथे उपविभाग कार्यालयाकडे पाठवला. विटा कार्यालयाने जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला. परंतु विटा व सांगली कार्यालयाची जागा अदलाबदल करताना प्रस्ताव गहाळ झाल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते. 

आटपाडी कृषी विभागाकडून तो प्रस्ताव शोधून काढण्यात आला. भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव विटा कार्यालयाकडे पाठवण्यात आला. विटा कार्यालयाकडून प्रस्ताव सांगली कार्यालयाकडे पाठवण्यात विलंब झाला. तो प्रस्ताव नुकताच पाठवण्यात आला. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही, असे सांगली कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 
नुकसान भरपाईचे मूल्यांकन होऊन निश्‍चित झालेल्या रक्कमेच्या तीन टक्के सेवा शुल्क कृषी विभागाकडे भरावे लागते. तेही दोन हजार दोनशे (बावीसशे) रुपये भरले आहेत. संबंधित कार्यालयाने प्रस्तावावर कार्यवाई करून ताबडतोब भरपाई द्यावी, अशी मागणी श्री. पवार यांनी केली आहे. 

2012 मध्ये मूल्यांकन 7 लाख 

सन 2012 मध्ये मूल्यांकन 7 लाखांचे झाले. महसूली रेकॉर्डला विठोबा नाना पवार यांचे जमिनीला नाव होते. ते सध्या हयात नाहीत. वारस म्हणून त्यांचा मुलगा मोहन पवार यांचे नाव लागले आहे. सात एकर जमीन आहे. डावा कालवा किलोमीटर 1 मध्ये 19 गुंठे व किलोमीटर 2 मध्ये 1 एकर 4 गुंठे, क्षेत्र गेले. अद्याप भरपाई मिळाली नाही. 

शासनाकडून कोणतीही भरपाई नाही

वडील विठोबा नाना पवार यांचे निधन झाले. वारस म्हणून माझे नावे लागले आहे. शासनाकडून कोणतीही भरपाई मिळालेली नाही. वडील हयात असताना दमडी मिळाला नाही. माज्या हयातीत तरी भरपाई मिळावी.
- मोहन पवार, नुकसानग्रस्त शेतकरी 

प्रस्ताव सांगली कार्यालयाकडे

घरनिकी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रस्ताव सांगली कार्यालयाकडे पाठवून दिला आहे.
- श्री. तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT