thieves  sakal
पश्चिम महाराष्ट्र

घरमालक गाढ झोपेत असताना चोरट्यानी मारला डल्ला

पोलीस यंत्रणा जयंतीच्या बंदोबस्तात असताना चोरट्यांनी आपला डाव साधला

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : घरमालक गाढ झोपेत असताना चोरट्यानी मागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यारील दोन बेडरूम मधील कपाटे फोडून ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ३५ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. शुक्रवार (ता.१५) सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अजित श्रीकांत तडकोड (रा. शास्त्रीनगर चौथा क्रॉस) यांनी या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अजित हे चांदीचा व्यवसाय करतात. गेल्या चार दिवसापूर्वी त्यांचे कुटुंबीय परगावी गेले असल्याने ते घरी एकटेच राहत होते. काल रात्री नेहमीप्रमाणे ते आपल्या घरच्या खालचा बेडरूममध्ये झोपले होते. चोरट्यानी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्यानंतर वरच्या मजल्यावर प्रवेश करत २ बेडरूमधील कपाटे फोडून त्यातील ३५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपयांची रोकड पळविली.

चोरटे घरात शिरून वरच्या मजल्यावरून २ बेडरूममधील कपाटे फोडली तरी अजित याना काहीच थांगपत्ता लागला नाही. आज सकाळी उठल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस यंत्रणा आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत बंदोबस्तात असताना चोरट्यांनी आपला डाव साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT