thief theft in nipani for day employee fear for this cases in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

निपाणीत चोरांचे धाडस वाढले ; आता दिवसाढवळ्याही होताहेत चोऱ्या

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : शहर व उपनगरांत ८ महिन्यांपूर्वी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या, पण एकाच महिन्यात शहर, उपनगरात ४ ठिकाणी धाडसी चोरी झाली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी शहराच्या मध्य वस्तीत गजबजलेल्या ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ४० तोळे दागिन्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या ब्रेकनंतर चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे.

चोरटे दिवसा डल्ला मारत असल्याने नोकरदारांतून भीती व्यक्त होत आहे. पोलिसांसमोर चोरट्यांचा तपास लावण्याचे आव्हान उभे आहे. शहर आणि उपनगरांत बरेचजण नोकरीस असल्याने दिवसभर घराला कुलूप असते. कार्यक्रमानिमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य कुलूप लावून दिवसभर जातात. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी शहर, उपनगरांत चोरीचा उच्छाद मांडला आहे. ही बाब ओळखून पोलिसांनी शहर, उपनगरात दिवसाही गस्त सुरू केली, मात्र वारंवार चोरीच्या घटना घडल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. 

नागरिकांनी खबरदारी घ्यावी 

नोकरी, व्यवसाय आणि कामधंद्यानिमित्ताने अनेक कुटुंबे एकापेक्षा अधिक दिवस घर आणि बंगल्यांना कुलूप लावून बिनधास्त जातात. त्याला नागरिकच जबाबदार असून अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांसह शेजाऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे.

"मध्यंतरी थांबलेल्या चोरीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी नागरिकांनी बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी. त्यामुळे नागरिकांसह पोलिसांची नजर राहून अशा घटना टाळता येणे शक्‍य आहे."

- अनिलकुमार कुंभार, उपनिरीक्षक, निपाणी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

Latest Marathi News Live Update : पुण्याला अवकाळीचा तडाखा, ३ तासात १४ ठिकाणी पडली झाडे

SCROLL FOR NEXT