Four thieves broke into the house and robbed.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत चोरट्यांनी घर फोडले ; रोकडसह पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास 

शैलेश पेटकर

सांगली ः शहरातील रमामाता नगर येथील काळे प्लॉटमध्ये चोरट्यांनी घरफोडी करुन 1 लाख 40 हजार रुपये रोख रकमेसह सोन्याचे आठ तोळे दागिने असा सुमारे 2 लाख 69 हजार 100 रुपयांचा ऐवज लंपास केला. 6 ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी धनाजी भिकाजी कांबळे (वय 46) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी कांबळे हे रमामाता नगर येथील काळे प्लॉट येथे राहतात. शुक्रवारी (ता. 6) पहाटे ते पाहुणे आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी कुटुंबीयांसह ते पुण्याला गेले होते. ते मंगळवारी दुपारी परत आले. यावेळी घराचा कडीकोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. कांबळे यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने घरात प्रवेश करुन दरवाजाला आतून कडी लावली.

घरातील साहित्य अस्ताव्यस्त करुन लोखंडी कपाटात असलेली 1 लाख 40 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने त्यामध्ये नेकलेस, अंगठ्या, कानातील टॉप्स, झुबे, सोन्याची चेन, वेढण असे आठ तोळ्याचे दागिने असा सुमारे 2 लाख 69 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या घटनेची माहिती कांबळे यांना शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. याबाबत पोलिसांनी अज्ञातावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT