Thieves break into liquor store: Stolen so much liquor? 
पश्चिम महाराष्ट्र

चोरट्यांनी फोडले दारूचे दुकान: इतकी दारू चोरली?

सकाळवृत्तसेवा

मिरज : शहरातील जुन्या बसस्थानकासमोर ए. सी. पाटील यांच्या मालकीचे संगम वाईन शॉप हे दारूचे दुकान चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडले. या दुकानातून एक लाख पाच हजार रुपयांची दारू चोरीस गेल्याचा संशय दुकानाच्या मालकांनी व्यक्त केला आहे. तथापि एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू घेऊन जाताना कोणालाच कसा संशय आला नाही. असा पोलिसांचा सवाल आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून जुन्या बस स्थानका समोर असलेल्या संगम वाईन शॉप या दुकानात ही चोरी झाली. चोरट्यांनी या दुकानात नेमका कसा प्रवेश केला याबाबत पोलिस यंत्रणेने कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांच्या दुकानांमधील प्रवेशाबाबत समाधानकारक उत्तर कोणाकडूनही मिळाले नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. तथापि दुकानातून दारूची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने निश्‍चितपणे एखादे वाहन सोबत आणले असावे आणि त्यानंतरच त्यातूनच चोरीची दारू नेली असावी असा पोलिसांचा संशय आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून हे दुकान बंद आहे. तत्पूर्वी ते राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील केले गेले होते. बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाचा परिसर असल्याने याठिकाणी मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या परिसरात सातत्याने गुन्हेगारी घटनाही घडत असतात हे सर्व गुन्हेगार मद्यपी आणि व्यसनाधीन असतात. त्यांच्याकडून ही चोरी झाल्याची शक्‍यता दुकान मालकांसह अनेकांनी व्यक्त केली.

परंतु पोलिस यंत्रणेने मात्र त्यावर अद्याप विश्वास ठेवलेला नाही. दरम्यान या दुकानात नेमक्‍या किती रुपयांची दारू विक्रीस ठेवण्यात आली होती. आणि यापैकी किती रकमेची दारू चोरट्यांनी लंपास केली. याबाबतचा तपशील सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकला नाही. याबाबतच्या कागदोपत्री नोंद राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडून मिळू शकल्या नाहीत. 

सीसीटीव्ही नसल्याने गूढ वाढले 

अतिशय मोक्‍याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या दारू दुकानाची उलाढाल मोठी आहे. तरीही तेथील सीटीव्ही बंद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या चोरीबाबतचे गूढ आणखीनच वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT