Thorat was on the way to BJP 
पश्चिम महाराष्ट्र

थोरातच होते भाजपच्या वाटेवर 

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : ""कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीबाबतचे वृत्त हे माझ्या बदनामीचे षड्‌यंत्र आहे. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात मी गुन्हा दाखल केला आहे. कॉंग्रेस सोडल्यानंतरही आमच्या सुख-दुःखाची चिंता करणारे मंत्री बाळासाहेब थोरातच दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार होते,'' असा आरोप आमदार राधाकृष्ण विखे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. 

विखे म्हणाले, ""यासाठी थोरातांनी दिल्लीत कोणाकोणाची भेट घेतली, त्यांची नावे आता आम्हाला जाहीर करायला लावू नका. कॉंग्रेसचे नेते खर्गे यांच्या न झालेल्या भेटीची चर्चा जाणीवपूर्वक सुरू करून मला बदनाम करण्याचा काहींचा हेतू आहे. या बदनामीकारक चर्चेच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. कॉंग्रेसला मिळालेल्या यशात थोरातांचे कर्तृत्व शून्य आहे. त्यांना सर्व अपघाताने मिळाले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी केलेल्या कामामुळेच राज्यात कॉंग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मागील साडेचार वर्षे थोरात गप्प होते. कॉंग्रेसचा राज्यात पूर्णपणे फुटबॉल झाला आहे. कॉंग्रेसचे नेतृत्व राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दावणीला बांधले गेले आहे.'' 

सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, अटी-शर्तींमुळे महाविकास आघाडीच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. शेतकऱ्यांचा अपेक्षाभंगही झाला. मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल वेगळाच आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कॉंग्रेस आणि "राष्ट्रवादी'चे आमदारही काही बोलायला तयार नाहीत. तुमचा सत्तेचा डाव चालू ठेवा; मात्र शेतकऱ्यांचा बळी देऊ नका, अशी कोपरखळीही विखे पाटील यांनी मारली. 

"त्यांनी थेट माध्यमांकडे जायला नको होते' 
जिल्ह्यातील भाजपच्या पराभूत आमदारांकडून होत असलेल्या आरोपांवर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले, ""या संदर्भात संबंधितांनी पक्षाच्या नेतृत्वाकडेच भूमिका मांडायला हवी होती. पक्षाच्या आचारसंहितेचा विचार करून थेट माध्यमांकडे जाण्याची गरज नव्हती. याबाबत मी कधीही माध्यमांसमोर भाष्य केले नाही. आता आमच्या सर्वांच्याच मागणीवरून पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबईतील बैठकीत विस्तृत चर्चा झाली. नेमलेल्या समितीकडून येणाऱ्या अहवालावर निर्णय होईल.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात पाेलिस दलात २२५ पदांची भरती'; सप्टेंबरअखेर भरा अर्ज, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘मैदानी’चे नियोजन

Who is Sushila Karki? सुशीला कार्की नेपाळच्या प्रमुखपदी? भारतासाठी आनंदाची बातमी की नवी डोकेदुखी? संबंध कसे असतील?

Gokul Dudh Politics : गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची; वर्चस्व मात्र हसन मुश्रीफ- सतेज पाटील यांचेच, महाडिक -मंत्री मुश्रीफ यांच्यात नवा वाद...

हा तर फक्त सामना! भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT