Those fourteen samples were also negative 
पश्चिम महाराष्ट्र

त्या चौदा जणांचे नमुनेही निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्राव नमुन्यांपैकी आज 14 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते "कोरोना'बाधित नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, आज आणखी पाच जणांचे स्राव नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. तसेच, आज पाच व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात आणि दोन व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात पुण्याहून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. नागरिकांनी हे संकट दूर करण्यासाठी आणखी काही दिवस सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

द्विवेदी म्हणाले, ""ज्या 14 जणांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत, ते निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया व अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी.'' 

दरम्यान, ज्या नागरिकांना घरीच वेगळे देखरेखीखाली ठेवले जाणार आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये. त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे न केल्यास संबंधितांना जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखाली ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी या व्यक्तींना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे आवश्‍यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिर, शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान, श्री क्षेत्र देवगड यांसह इतर देवस्थानांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यामुळे बाहेरील राज्यांतून, तसेच इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आवश्‍यकता असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे ते म्हणाले. 

यापूर्वीच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्र, तसेच ग्रामीण क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय, तंत्र प्रशाला, निवासी वसतिगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, कोणतेही खासगी क्‍लासेस या काळात सुरू राहणार नाहीत. तसे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या काळात शहर व जिल्ह्यातील दुकानेही अनावश्‍यक गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्याची सूचना त्यांनी केली. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT