the three acre graps was completely destroyed by unknown weed spraying on the grape farm sangli news 
पश्चिम महाराष्ट्र

'ते' रात्री आले अन् बहरलेल्या द्राक्ष बागेवर तणनाशक फवारुन गेले...

सकाळ वृत्तसेवा

विसापूर (सांगली) - तणनाशक फवारल्याने तीन एकर द्राक्ष बाग पूर्णपणे उद्‌ध्वस्त  झाली. तासगाव विटे रस्त्यावर महादेव मळा (बोरगाव) येथे हा धक्कादायक प्रकार घडला. हातनोली येथील अर्जुन जाधव यांची ही द्राक्षबाग आहे. श्री. जाधव यांना तब्बल पंचवीस लाखांचा फटका बसला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध श्री. जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

बहरलेलं पिकच केलं उद्‌ध्वस्त

याबाबतची माहिती अशी, की हातनोलीतील अर्जुन जाधव व व मुलगा सुधीर यांनी महादेव मळा येथे तीन एकर द्राक्ष बाग लावली आहे. अडीच एकर साधी सोनाका व अर्धा एकर सुपर सोनाका असे पीक घेतले होते. पावसाने सर्वत्र द्राक्षाचे प्रचंड नुकसान झाले असताना श्री. जाधव यांनी अहोरात्र मेहनत घेतली. विशेषतः कम्प्युटर डिप्लोमाचे शिक्षण घेतलेल्या श्री. जाधव यांचा मुलगा सुधीर याने भरपूर कष्ट घेतले होते. त्यामुळे बागेत द्राक्षांचे पीक जोमाने आले होते.

शेतकऱ्याची अज्ञाताविरुद्ध पोलिसांत तक्रार

सुपर सोनाका द्राक्षे मऊ पडण्यास सुरुवात झाली. महिन्याभरात द्राक्षे जाणार होती. मागील सोमवारी रात्री या बागेवर अज्ञातांने तणनाशक औषध फवारले. ही बाब सकाळी लक्षात आली. 
त्यानंतर दोन-तीन दिवसात पान गळाली, घड तुटून खाली पडले. याप्रकाराने जाधव पिता-पुत्र हवालदील झाले. भरल्या डोळ्यांनी प्रत्येक झाडाला हात लावत विमनस्क अवस्थेत बसले. अशा अवस्थेतही औषध फवारणी करून झाडे वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. झाडाची काडी घेऊन द्राक्षतज्ञ श्री. म्हेत्रे यांना दाखवले. तहसीलदार कृषी विभाग व तलाठ्यानाही माहिती दिली. पोलिसांत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Latest Marathi News Live Update : हडपसर परिसरातील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदामंत्र्यांकडून अभियंत्यांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

SCROLL FOR NEXT