Three arrested for trying to sell snakes 
पश्चिम महाराष्ट्र

दुतोंडी सापांची विक्री करण्याच्या प्रयत्नातील तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दुतोंडी सापाची महाराष्ट्रात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. शनिवार (ता.9) वनविभागाच्या पोलिस पथकाने अथणी तालुक्‍यातील तेलसंग क्रॉस येथे ही कारवाई केली असून त्यांच्याकडून दोन दुतोंडी साप जप्त करण्यात आले आहेत. अक्षय गुरु कोट्याळ (वय 25, रा. विजापूर अक्षय गुरप्पा लाळसंगी (वय 19, रा. सिंधगी विद्यानगर) आणि दुंडाप्पा अय्याप्पा बागायत (वय 40, रा. विजापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. अन्य तीघे संशयित फरारी असून त्यांच्याकडेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

शनिवार (ता.9) रात्री 9 च्या सुमारास काहीजण अथणी तालुक्‍यातील तेलसंग क्रॉसनजिक दुतोंडी सापांची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडे दोन दुतोंडी साप असून त्यांची महाराष्ट्रात विक्री करण्यात येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती वनखात्याच्या पोलिस पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून छापा टाकला असता  तीघे संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. शिवू मलकप्पा कमलाकर (वय 24, रा. सिंधगी विद्यानगर), शंकर काशीनाथ लोनी (रा. विजापूर), अब्दुलबाशा (रा. गुलबर्गा) हे तीघे फरारी झाले. अटकेतील संशयिताकडून दोन दुतोंडी सात व इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT