crime.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिस छाप्यानंतर तिघे  मटका बुकी झाले पसार : मटका घेणाऱ्या पाचजणांना अटक 

सकाळवृत्तसेवा

सांगली-  येथील सांगली शहर पोलिसांनी अधीक्षक दिक्षित गेडाम यांच्या आदेशानंतर तीन ठिकाणी मटका अड्डयांवर छापे टाकून दोन मटका बुकीसह पाचजणांना अटक केली. छाप्यात 12 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तर छाप्यानंतर मटका बुकी नितीन यल्लाप्पा दोडमणी, लक्ष्मण जाधव (रा. गोसावी गल्ली, खणभाग सांगली), अमित गर्जे-पाटील (रा. खणभाग) हे तीन बुकी पसार झाले आहेत. 

पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार उपाधीक्षक अजित टिके यांनी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांना अवैध धंद्यावर छापे टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी तीन ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये शास्त्री चौकात वासू ऊर्फ सुनिल दिलीप वैद्य (वय 39, रा. काळी वाट, कल्याणकर प्लॉट, चौथी गल्ली) याला अटक केली. त्याचा बुकी मालक नितीन दोडमणी व लक्ष्मण जाधव असल्याचे स्पष्ट झाले. पटेल चौक येथे दुसरा छापा टाकून गणेश चंद्रकांत नागे (वय 25, जामवाडी) याला अटक केली. तसेच त्याचा मालक पंकज भोसले आरि संजय महाजन (रा. जामवाडी) या दोघांनाही अटक केली. तसेच दत्तनगर जॅकवेलजवळ अरबाज नजीर कलेगार (वय 20) याला मटका घेताना अटक केली. त्याचा बुकी मालक अमित गर्जे-पाटील असल्याचे स्पष्ट झाले. 

तीन छाप्यात दोन बुकींसह पाचजणांना अटक केली. तसेच 12 हजार रूपये, मोबाईल, मटका साहित्य जप्त केले. छाप्यानंतर बुकी मालक दोडमणी, जाधव, गर्जे-पाटील हे तिघे पसार झाले आहेत. तिघांवर यापूर्वी मटक्‍याचे गुन्हे दाखल आहेत. सहाय्यक निरीक्षक निलेश बागाव, हवालदार दिलीप जाधव, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, झाकीर काझी, सचिन घाडगे, विक्रम खोत, गणेश कांबळे, श्री. शिंदे, श्री. कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT