three corona positive cases belagavi kudachi 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग - बेळगावातील कुडचीत सापडले तीन कोरोना रूग्ण

सकाळ वृत्तसेवा

ब्रेकिंग - बेळगावातील कुडचीत सापडे तीन कोरोना रूग्ण  
रायबाग : तालुक्यातील कुडची येथे आज (ता. १३) आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची धास्ती वाढली आहे. येथे या आधीचे सात रुग्ण आहेत. त्यात पुन्हा भर पडल्याने रुग्णांची संख्या दहावर पोचली असल्याने लाॅडाऊनची अधिक कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी येथेच तळ ठोकला असून कोरोनाला पळवून लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. 

कुडची येथील सरकारी शाळेच्या इमारतीत होमक्वारंटाईन लोकांची व्यवस्था केली आहे. त्यातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. संशयितांना कोरोना झाल्याची लक्षणे दिसताच रात्री त्यांना बेळगावला हलविण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी अहवाल येताच बाधित लोकांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुसार आजवर कुडची येथील दहा जण कोरोनाग्रस्त बनले आहेत. 

त्यामुळे हे शहर अधोरेखित झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासन, पोलिस व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. सुरुवातीला बेळगाव येथे नेऊन संशयितांची तपासणी केल्यावर होम क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर बाधित लोकांची यादी बाहेर पडत असल्याने शहरवासीय भयभीत झाले आहेत. जमावबंदी, लॉकडाऊन नंतर ११ एप्रिलपासून सीलडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. या काळात नागरिकांचे खूप हाल होत आहेत. आता रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीतीमध्ये भर पडली आहे. यापुढे तर अत्यावश्यक सेवांवर देखील बंधने येणार असल्याने चिंता वाढली आहे. येथे सँनिटायझर स्प्रे शेड उभारण्यात आले आहे. पण लोक जात नसल्याने त्याचा उपयोग होताना दिसत नाही. नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग व आरोग्य तपासणीचे कार्य आशा कार्यकर्त्या व वैद्यकीय खात्याकडून सुरू आहे. आता रुग्ण वाढल्याने शहरावर विविध खात्यातील अधिकाऱ्यांची नजर अधिक बारीक होणार आहे. 


आव्हान रोखण्याचे आव्हान

कुडची येथे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध खात्यांकडून लक्ष ठेवले जात आहे. मात्र कोरोनाची बाधा झालेल्यांची आकडेवारी वाढतच असल्याने हे आव्हान रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्या दृष्टीने येत्या काळात आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT