salgare.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अरेरे दुर्दैव...येथे वीज कोसळून तीन गायी मृत्यूमुखी 

सकाळवृत्तसेवा

सलगरे (सांगली)- मिरज तालुक्‍यातील सलगरे येथे जनावरांच्या गोठ्यावर विज पडून दोन जर्शी आणि एका देशी गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी, सलगरे-मदभावी रस्त्यावर अरुण शिवाजी पाटील (कर्नाळकर) यांच्या राहत्या घराला लागूनच जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यांमध्ये बांधलेली दोन जर्शी, एक देशी गाय व लहान वासरु आणि एक रेडी अशी एकण पाच जनावरे बांधलेली होती. दुपारी दीडच्या सुमारास सलगरे परीसरात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दोनच्या सुमारास अरुण पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यावरच विज कोसळली. त्यामध्ये दुभत्या दोन जर्शी गायी व एक देशी गाय अशा तीन गायी जागेवरच मृत्युमुखी पडल्या.

वीज कोसळून तीन गायींचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरुण पाटील यांचे सुमारे एक लाख पंच्याऐशी हजाराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने लहान रेडकू व जर्शी गायीचे वासरु बचावले आहे. दैव बलवत्तर म्हणून गोठ्याला लागूनच असलेल्या राहत्या घरात जिवितहानी झाली नाही. वीज कोसळून तीन गायी मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर तलाठी अर्चना तोडकर, कृषी सहाय्यक गिरीश भोजे, पोलीस पाटील उद्धव खोत, कोतवाल सिध्दू लोहार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उपसरपंच सुरेश कोळेकर यांनी ही घटनास्थळी भेट दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टात काय घडलं? न्यायाधीशांनीच दिला कोर्टासमोर आंदोलन करण्याचा इशारा, प्रशासनावर तीव्र नाराजी

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिल मास्टरप्लॅन, स्वत:च्या खर्चानेच ५ गोलंदांजाना सोबत नेणार

एक्सप्रेस वेवर मृत्यूचं तांडव! भाविकांच्या ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

Mumbai Local: देवीच्या दर्शनासाठी लोकल प्रवास करताय? वेळापत्रक पहाच, 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक रेल्वे सेवा रद्द

Latest Marathi News Live Update : यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतताना हसन मुश्रीफ यांचे वाहन शेतकऱ्यांनी अडवले, गोकाकजवळील घटना

SCROLL FOR NEXT