three d photo collection of Shivaji Maharaj by Dr Bade 
पश्चिम महाराष्ट्र

Video : छत्रपती शिवरायांच्या कार्याचे थ्रीडी दर्शन!

अर्चना बनगे

कोल्हापूर : वैद्यकीय व्यवसाय सांभाळत इचलकरंजी तालुका हातकणंगले येथील डॉ. ज्योती दशावतर बडे यांनी कोलाज मधून थ्रीडी शिवचरित्र साकारले आहे. तब्बल 12 थ्रीडी कोलाजमधून साकारलेल्या या चित्रात शिवाजी महाराजांचा जन्मकाळ ते मृत्यूपर्यंतचा सर्व प्रवास समावेश करण्यात आला आहे.

डॉ. ज्योती बडे यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी हे होय. गावामध्ये असतानाच लहानपणी ते दिवाळीच्या काळामध्ये किल्ले करत असत. त्यावेळी त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राबद्दल मोठे आकर्षण होते. खरेतर त्यांना कला अथवा अन्य क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र घरच्या आग्रहास्तव त्या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेतला.

वैद्यकीय क्षेत्र सांभाळत असताना त्यांच्यातील सुप्त कलागुणांची संधी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कोलाजमध्ये त्यांनी सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक प्रसंगाचे चित्र तयार केले. त्यामध्ये अनेक रंगसंगतीचा वापर करीत मावळ्यांसह शिवाजी महाराजांचा दरबार साकारले आहे. रंगीबेरंगी कपडे व अनेक साहित्य मूळ स्वरूपात वापरल्यामुळे हे चित्र खूपच आकर्षक ठरले. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म ते बालपण, प्रशिक्षण, आग्र्याहून सुटका अशा विविध विषयासह चित्रे साकारण्याचा निर्णय घेतला.

तब्बल पाच ते सहा वर्षे प्रचंड परिश्रम घेत साकारलेले हे भव्य कोलाज आता आकर्षक बनले आहे. अनेक ठिकाणी या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. डॉक्टर बडे यांना त्यांचे पती डॉ. दशावतार बडे यांचे महत्त्वपूर्ण सहयोग लाभले. त्यांच्या या कलेसाठी त्यांनी दवाखान्यातच एक स्वतंत्र दालनं तयार करून दिले आहे. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत अत्यंत उत्कृष्ट कला जपलेल्या डॉक्टर बडे यांचे हे परिश्रम नक्कीच कौतुकास्पद ठरताहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT