download (1).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

"हॉटस्पॉट'मधून  आले तीनशे प्रवाशी ः कुठे वाचा 

सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रात हॉटस्पॉटवरून आलेल्या तीनशे नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याबाहेरुन महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी 50 वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्‍ती तसेच हॉटस्पॉट ठरलेल्या गावांमधून येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली आहे. 

कोविड 19 साथीचा महापालिका क्षेत्रातील तीनही शहरांमध्ये प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी नियोजनबद्ध काम केले आहे. त्यामुळे या तीनही शहरात गेल्या तीन महिन्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. आतापर्यंत 12 व्यक्तींनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्या संपर्कातील लोकांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात राहिला आहे. 

कोरोनाचा रुग्ण आढळून येताच कंटेन्मेंट झोन लागू करणे, बफर झोन लागू करणे, रुग्णाच्या संपर्कातील लोकांना आयसोलेशन करणे, क्वारंटाईन करणे, परिसरात नागरिकांची तपासणी करणे आदी प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने राबवण्यात येत असल्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव वाढू शकला नाही. 

गेल्या काही दिवसात सांगली मिरज आणि कुपवाड शहरात जिल्ह्याबाहेरुन हॉटस्पॉट जिल्ह्यातून तसेच परराज्यातून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग सापडत असल्याने अशा प्रवासी नागरिकांचे स्वब घेऊन त्यांची चाचणी करण्याची सूचना आयुक्त कापडणीस यांनी आरोग्य विभागाला केली आहे. त्यासाठी तिन्ही शहरात स्वब घेतले जात आहेत. खबरदारी म्हणून पीपीए किट परिधान करून वैद्यकीय पथकाकडून हे स्वब घेतले जात आहेत.

यामध्ये आतापर्यंत मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्हयातून आलेल्या 300 प्रवासी नागरिकांचे स्वब घेण्यात आले आहेत. वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. वैभव पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. शबाना लांडगे, डॉ. वैशाली पाटील, डॉ. संजीवनी घाडगे, डॉ. आशुतोष चोपडे, अलका तोडकर यांच्या टीमकडून हे काम सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी झेप; अवघ्या एका दिवसात तब्बल ३.७८ टक्क्यांनी वाढ

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT