accident sakal
पश्चिम महाराष्ट्र

नेवरीजवळ दोन मोटारीच्या धडकेत तिघे ठार

पोलिसांच्या मदतीने विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ वृत्तसेवा

पोलिसांच्या मदतीने विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कडेगाव : येथे दोन मोटारींची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात(accident) तिघेजण ठार झाले. आजपहाटेच्या पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात विटा(vita) येथीलसुदर्शन गजानन निकम (वय २८) आणि डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील कपिल माणिकझांबरे (वय २८) व पत्नी धनश्री झांबरे (वय २५) हे तिघेजण ठार झाले.अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी, डोंगरसोनी येथील झांबरे कुटुंबिय आज पहाटेच्या सुमारास मोटार (एमएच १४ सीसी ६५५०) मधून विट्याकडे निघालेहोते.

तर विटा येथील सुदर्शन निकम व संग्राम संजय गायकवाड हे दोघेजण पहाटेच्या सुमारास मोटार (एमएच १० सीए ००३१) मधून खेराडे येथून विट्याकडे येत होते. महाबळेश्‍वर-विटा या राज्य मार्गावरील नेवरी येथे पहाटे पावणे तीनच्या सुमारास दोन्ही मोटारींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरात होती की दोन्ही मोटारींचा चक्काचूर झाला.अपघातानंतर परिसरातील नागरिक तत्काळ मदतीसाठी धावले. जखमी कपिल व धनश्रीझांबरे यांना तत्काळ पोलिसांच्या मदतीने विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू उपचार सुरू असताना दोघांचा दुर्दैवी मृत्यूझाला. तर जखमी सुदर्शन निकम याला कराडच्या रूग्णालयात हलवले. त्याचाही मृत्यू झाला. अपघातात सुदर्शनबरोबर असलेला संग्राम गायकवाड व झांबरे कुटुंबियांबरोबर असलेला प्रज्वल झांबरे (वय २१) हे दोघेजण जखमी झाले. अपघातप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात प्राथमिक नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT