Three others in Jamkhed contracted corona 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाचा धोका वाढला... जामखेडच्या आणखी तिघांना लागण 

सकाळ वृत्तसेवा

नगर/जामखेड : जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी 3 व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे. तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या 43 झाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल 41 व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 38 व्यक्तींचे अहवाल काल रात्री प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित 03 अहवालाची प्रतीक्षा होती. ते अहवाल आज दुपारी प्राप्त झाले. त्यात, जामखेड मधील या तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये 45 आणि 50 वर्षीय पुरुष तर 35 वर्षीय महिला असे तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले. 


काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधीत आढळून आल्या.
यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता 43 झाली आहे. त्यापैकी 24 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 02 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटल मध्ये 14 रुग्ण असून या तिघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे. 

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1495 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1419 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 15 अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या 690 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून 122 जणांना हॉस्पिटल मध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात 102, एआयएमएसमध्ये 06 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

दिवसभर ACमध्ये बसता? तुमची इम्युनिटी कमी होतेय का? काय काळजी घ्यावी जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान, भरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT