Three Patient From Miraj Hospital Thrown On Road 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ! मिरज सिव्हीलमधील तीन रूग्णांना फेकले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

सांगली - मिरजेच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या तीन रूग्णांवर उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर आणून फेकून दिल्याचा प्रकार घडला. या तीन रूग्णांना नंतर सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. पण त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. शिवलिंग कुचनुरे (रा. गणेशवाडी, ता. शिरोळ) असे मृताचे नाव आहे. त्यामुळे वैद्यकीय पंढरीत खळबळ उडाली आहे.

मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने अधिष्ठातांकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगलीतील जुना कुपवाड रस्त्यावर सुंदर पार्क या निर्जन रस्त्यावर तीन मृतदेह आणून टाकल्याची अफवा दोन नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास पसरली होती. त्यामुळे जागरूक नागरिकांनी तिकडे धाव घेतली. तेव्हा तिघेजण रूग्ण जीवंत असून उपचाराअभावी निपचिप पडल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी एका रूग्णाने धक्कादायक माहिती सांगितली.

तिन्ही रूग्णांना डिसचार्ज देऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असल्याचे सांगून मिरज सिव्हीलमधून बाहेर काढले. त्यानंतर सांगलीत निर्जन रस्त्यावर आणून त्यांना फेकले. प्रतिकार शक्ती नसलेले तिन्ही रूग्ण रस्त्यावर पडून राहिले, तर कुत्री हल्ला करण्याचा धोका होता. त्यामुळे नागरिकांनी संजयनगर पोलिसात या प्रकाराची माहिती दिली.  त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांच्या मदतीने त्यांच्याच गाडीतून रात्री अकराच्या सुमारास तिघांना सिव्हीलमध्ये उपचारास दाखल केले. तिघेही रूग्ण गंभीर होते. त्यापैकी शिवलिंग कुचनुरे यांचा आज मृत्यू झाला.

दरम्यान मिरज सिव्हीलने फेकून दिलेल्या तीन रूग्णांपैकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने वैद्यकीय पंढरीत खळबळ उडाली आहे. वैद्यकीय पंढरीला काळिमा फासल्या गेल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर आणि कार्यकर्त्यांनी तातडीने सिव्हीलमध्ये
धाव घेतली. अधिष्ठाता यांना याप्रकरणी निवेदन दिले आहे. मिरजेतील संबंधित विभाग प्रमुख, डॉक्‍टर आणि कर्मचारी यांना तातडीने नोकरीतून बडतर्फ करावे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

इन कॅमेरा शवविच्छेदन करा -

मृत शिवलिंग कुचनुरे यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख काटकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT