three peoples from belgum they were not infected with coronas  
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाचा संसर्ग झालेल्या त्या लोकांबरोबर होते बेळगावचे तिघे पण...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - दुबईला सहलीसाठी गेलेल्या 40 जणांपैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या 40 जणांमध्ये बेळगावच्या तिघांचा समावेश होता, पण त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.शशीकांत मुन्याळ यांनी ही माहिती दिली आहे. त्या तिघांचीही आरोग्य विभागाने तपासणी केली आहे, ते सुरक्षीत आहेत असे मुन्याळ यानी 'सकाळ'ला सांगीतले.

कोरोनाबाबत दररोज राज्याच्या आरोग्य विभागाला माहिती दिली जात आहे, तिघांबाबतची माहितीही दिली आहे असे ते म्हणाले. पण त्या तिघांची नावे सांगणे त्यांनी टाळले. याआधी चिन व श्रीलंका येथून आलेल्या नऊ जणांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाने केली होती. त्यांनाही कोरोनाची लागण झाली नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात आले होते. आता या तिघांवरही आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. दुबई येथे गेलेल्या 40 जणांपैकी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे. त्यामुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. बेळगावचे ते तिघे कोण? असा प्रश्‍न यामुळे उपस्थित झाला आहे. पण यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बेळगावात एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगितले.

जिल्हा आरोग्य विभागाने मात्र याबाबत स्पष्ट माहिती दिली. कोरोनाबाबत जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग व महापालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. जिल्हा रूग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. विमानतळावर तपासणी सुरू करण्यात आली आहे, तेथेही एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. वृत्तवाहिनीच्या दाव्यामुळे गुरूवारी दिवसभर बेळगावात उलटसुलट चर्चा सुरू होती. वृत्तवाहीनीने केलेल्या दाव्यानुसार 40 जणांचे एक पथक ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून 23 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. ते पथक 1 मार्च रोजी भारतात परत आहे. त्यातील पुणे येथील एक दांपत्य व त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. तर 40 जणांपैकी मुंबईच्या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या पथकात पिंपरी-चिंचवड, ठाणे, अहमदनगर, बीड, नागपूर व रायगड येथील काहींचा समावेश होता. महाराष्ट्र शासनाने या सर्व 40 जणांची माहिती घेतल्याचा दावाही वाहीनीने केला आहे. पण त्यातील तिघे बेळगावचे असले तरी त्यांच्यामुळे बेळगावकराना कोणताही धोका नसल्याचे बेळगावच्या आरोग्याधिकाऱ्यांचे म्हणने आहे. बेळगाव जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही संशयीत सापडलेला नाही. तरीही महापालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग दक्ष आहे. 

दुबई येथे गेलेल्या त्या तिघांची माहिती आरोग्य विभागाला आहे. त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली आहे. त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, पण आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. 
- शशीकांत मुन्याळ, जिल्हा आरोग्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT