Three thieves arrested for burglary; Five burglary cases solved 
पश्चिम महाराष्ट्र

घरफोडी करणारे तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद; पाच घरफोड्यांचा छडा

शैलेश पेटकर

सांगली ः सांगलीसह संजयनगर परिसरात घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. करण रामा पाटील (वय 21), रोहित मधुकर गोसावी (20) व रोहित बाळू सपाटे (19, सर्व रा. वाल्मीकी आवास, जुना बुधगाव रोड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, एका अल्पवयिनाच्या मदतीने चोऱ्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. शहरात आणि संजयनगर पोलिस ठाणे हद्दीतील पाच चोऱ्यांचा छडा लागला असून, संशयितांकडून सुमारे 37 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी शहरातील घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेस गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आज पोलिस दिलीप जाधव, विक्रम खोत, जयवंत पवार, गुंडोपंत दोरकर, झाकीरहुसेन काझी यांना माहिती मिळाली की, जुना जकात नाका परिसरात संशयित तिघे बसले आहेत. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी शहर पोलिस ठाण्याकडील चार, तर संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एका चोरीची कबुली दिली.

शहरातील अप्पासाहेब पाटील नगरमधील ट्रान्स्पोर्ट ऑफिस, गीता स्वीट मार्ट, जुना बुधगाव रस्त्यावरील पानपट्टी, घनशामनगरमधील बंगला, कलानगरमधील फ्लॅटमध्ये चोरी केल्याची संशयितांनी कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल व इतर चोरीचा मालही जप्त केला आहे. 

रेकॉर्डवरील गुन्हेगार 
तिघेही सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्यांच्यावर घरफोडी-चोरीचे गुन्हे दाखल आहेत. करण पाटील आणि रोहित गोसावी या दोघांवर यापूर्वी प्रत्येकी पाच गुन्हे दाखल आहेत. रोहित सपाटे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.  

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT