Three tons of plastic confiscated at Sangamner 
पश्चिम महाराष्ट्र

संगमनेरमध्ये तीन टन प्लॅस्टिक जप्त 

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्लॅस्टिकविरोधी पथकाने शहराच्या विविध भागांतील दुकानांवर कारवाई करून तीन टन प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त केल्या. यात 47 हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

नगरपालिकेच्या पथकाने संशयित दुकानांत राबविलेल्या तपासणी मोहिमेत, मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या, ग्लास, ताटे आदी वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आढळल्या. शहरातील जोगिंदर बत्रा (कोहिनूर क्‍लॉथ), महेश राजपाल (साईराज ट्रेडर्स), दिलीप पारख (पारख ट्रेडर्स), प्रकाश जोशी (जोशी प्लॅस्टिक्‍स), आप्पा कोळपकर (गृह वस्तू भांडार), इंदरलाल कापड दुकान, प्रमोदसिंग परदेशी, रघुवंशी ट्रेडर्स आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

या कारवाईत मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासनाधिकारी श्रीनिवास पगडाल, आरोग्य विभागाचे निरीक्षक अश्विन पुंड, अरविंद गुजर, अतिक्रमणविरोधी पथकाचे सुदाम सातपुते, अकलाख शेख, अल्ताफ शेख आदींसह अजय जेधे, विजय अभंग, चंद्रकांत ढोले यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला. 

संगमनेर नगरपालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांसह अन्य वस्तूंचा वापर व विक्रीवर यापूर्वीच बंदी घातलेली आहे. नियमांचा भंग करणारे नागरिक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी कापडी पिशव्या व दुधासाठी भांड्यांचा वापर करावा. 
- डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tamil Nadu political drama विजयसमोर पेच! सत्तास्थापनेचा दावा केला पण बहुमतच नाही; राज्यपालांनाही विश्वास नाही, जादुई आकडा कसा गाठणार TVK?

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

चक्क ४९% Gen Z लोक फसवणुकीच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचले; लिंक्डइनचा इशारा, नोकरी शोधताना 'हे' चुकीचे संकेत ओळखा

SCROLL FOR NEXT