पश्चिम महाराष्ट्र

आष्टा - तासगाव रोडवर अपघातामध्ये तीन युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

आष्टा - गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक व मोटरसायकल यांच्यात रात्री बाराच्या सुमारास तासगाव रोडवर अपघात झाला. या अपघातामध्ये बावची (ता. वाळवा) येथील तीन युवक ठार झाले. प्रवीण अशोक सुर्यवंशी (28), अनिकेत आकाश माळी (28), सुमित संजय पाटील (पोखरणीकर) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सोमवारी रात्री 12 च्या सुमारास आष्टा तासगाव रोडवर महावितरण कार्यालयासमोर हा अपघात झाला. सुमित, अनिकेत व प्रवीण हे मोटरसायकल (क्र. एमएच 10 -  बीएच - 6574) वरून आष्टा तासगाव रोडवरील हॉटेलला जेवण करण्यासाठी निघाले होते. महावितरण कार्यालयासमोर भिलवडीकडून गॅस सिलेंडर भरून येणाऱ्या ट्रॅकशी त्यांची धडक झाली. या धडकेत प्रवीण व अनिकेत रस्त्यावर पडले तर सुमित हा रस्त्याकडेला फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रवीण व अनिकेत जागीच ठार झाले. तर सुमित याला तातडीने सांगली येथे रुग्णालयात दाखल केले. पहाटे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सुमित व प्रवीणचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले होते, तर अनिकेतने इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Temple Darshan: भीमाशंकर मंदिर सर्वांसाठी खुले! दर्शनाचे नियम आणि वेळेत झाले बदल

Uruli Kanchan Rain : उरुळी कांचन येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साठण्याने वाहतुकीला अडथळा

Pune Rain : पुण्यात पावसाची शक्यता नाहीच; प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र

Katraj News : कात्रज घाट आणि वनपरिक्षेत्रात मेडिकल वेस्टेजचे ढीग;पर्यावरण व वन्यजीवांसमोर गंभीर धोका

TET Exam : ‘टीईटी’ परीक्षेत दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT