पश्चिम महाराष्ट्र

अरे वा....! सोलापुरातील "डबेवाला' झाला न्यायाधीश 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः "डबेवाला' हा शब्द ऐकला की मुंबईतील डबेवाले चेहऱ्यासमोर येतात. त्यांची शिस्त आणि कामातील वक्तशीरपणा तसेच नियोजनामुळे त्यांनी विश्‍वख्याती मिळवली आहे. त्यांच्याप्रमाणेच एकेकाळी घरोघरी मेसचे डबे पुरविणारे येथील रमेश येलदी यांनीही प्रतिकूल परिस्थितीत उत्तुंग यश मिळवले. नुकत्याच जाहीर झालेल्या स्पर्धा परिक्षांमध्ये ते जिल्हा न्यायाधीशाची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 

दुर्दम्य इच्छाशक्तीचे फळ 
माणसाकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असली तर काहीही साध्य करु शकतो. अगदी असाच प्रकार येथील सुनील येलदी यांच्याबाबत झाला. येलदी यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी एकेकाळी "डबेवाला' म्हणून काम करावे लागले. आज ही व्यक्ती स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन चक्क न्यायाधीश झाली आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत ते उत्तीर्ण झाले. 

पद्मशाली समाजातील चौथे न्यायाधीश 
सुनील येलदी यांच्या रुपाने पद्मशाली समाजाची चौथी व्यक्ती या पदावर आरुढ झाली आहे. सध्या ते सात-आठ वर्षांपासून सोलापूर जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदाची परिक्षा दिली आणि त्यात यश मिळविले. याआधी पद्मशाली समाजाचे विष्णू दासरी, उषा इंदापुरे, अनिल गुन्नाल असे तीन जण या परिक्षेत उत्तीर्ण होऊन पदावर रूजू झाले आहेत. 

वडील गिरणीकामगार, आई विडी कामगार 
येलदी यांचे वडील लक्ष्मीपती हे सोलापूर सूत गिरणीत काम करीत. आई लक्ष्मीबाई या विडी कामगार. गिरणी बंद पडल्यावर लक्ष्मीपती यांना कठिण दिवस काढावे लागले. याच काळात सुनील हे बीएससीचे शिक्षण घेत होते. घरची आर्थिक परिस्थिती नीट नसल्याने सुनील हे काही काळ केबल रिपेअरींगचे काम केले. नंतर मेसचे डबे पुरविण्याचे कामही त्यांना करावे लागले. जिद्दीने त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 

शिकत असताना लागली नोकरी 
श्री. येलदी एलएलबीचे शिक्षण घेत असताना त्यांना जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपीकची नोकरी लागली. नोकरी लागल्यावर आपण आणखीन शिकून न्यायाधीश पदावर जावे असे त्यांचे स्वप्न होते. एलएमएमचे शिक्षणही पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमपीएससी या स्पर्धा परिक्षेची तयारी केली. अखेर या परिक्षेत उत्तीर्ण होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. येलदी यांचे शालेय शिक्षण अहिल्याबाई प्रशालेत, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे कुचन प्रशालेत, बीएससीचे शिक्षण वालचंद कॉलेज तर एलएलबी-एलएलएमचे शिक्षण दयानंद विधी महाविद्यालयात झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT