tiktok fem Akash Jadhav commits suicide
tiktok fem Akash Jadhav commits suicide  
पश्चिम महाराष्ट्र

'टिकटॉक'फेम आकाशची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : टिकटॉकवर प्रसिद्ध असणाऱ्या आकाश जाधव (वय 27, रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याने रेल्वे खाली आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

आकाश जाधव हा कार चालक म्हणून काम करत होता. टिकटॉक या सोशल मीडीयावर तो प्रसिद्ध होता. वेगवेगळ्या विषयांवर तो व्हिडीओ करायचा. त्याला मोठ्या संख्येने फॉलोअर होते. मानसिक तणावातून रविवारी रात्री आकाशने आत्महत्येसाठी गोळ्या खाल्ल्या. विषही प्राशन केले. शेवटी रेल्वे रुळावर जावून तो झोपला. काही तरुणांनी त्याला पाहून आरडाओरड केली. तरुणांनी हटकल्यानंतर आकाश काही अंतरावर जावून पुन्हा रेल्वे रुळावर झोपला.

अखेर त्याचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले. आकाशने आत्महत्या केल्याचे कळताच कुटूंबीयांसह मित्रांना धक्का बसला. आकाश विवाहित असून त्याला एक मुलगा आहे, असे विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी गणेश डोंगरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT