This time in ganesh festival use traditional instrument!
This time in ganesh festival use traditional instrument! 
पश्चिम महाराष्ट्र

यंदा पारंपरिक वाद्यांचाच दणदणाट! 

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : जिल्हा प्रशासनाने मोठ्या आवाजाच्या भिंती सील करण्याचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले असले तरीही या निर्णयाचे स्वागत होत आहे. कारवाईची धास्ती घेऊन अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सवासाठी पारंपरिक वाद्यांना पसंती देत वाद्ये खरेदी केली आहेत. ढोल-ताशा पथकांची संख्याही वाढली आहे. वाद्य विक्रेत्यांनाही अच्छे दिन आलेले दिसतात. 

गणेशोत्सव आणि मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक हे समीकरणच झाले होते. मात्र, त्याला छेद देत पोलिसांनी आता मोठ्या आवाजाच्या भिंतींवर बंदी घातली आहे. ही यंत्रणा लावण्यात आली तर कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट सूचना कोल्हापूर विभागीय विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या आहेत. या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणीसाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातून पारंपरिक वाद्यांना गणेशोत्सव मंडळांकडून पसंती मिळू लागली आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून पारंपरिक वाद्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे. अनेक गणेश मंडळांनी ही पारंपरिक वाद्ये खरेदी केली आहेत. त्याचबरोबर अनेक शहरांत, ग्रामीण भागात ढोल-ताशा पथकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून वाद्य विक्रेत्यांनाही चांगले दिवस आलेत. त्यांचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

तरुणांसाठी कमाईचे साधन 
गणेशोत्सवासाठी यंदा ढोल-ताशा पथकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. अनेक गणेश मंडळांनी मोठ्या आवाजाच्या स्पीकरना फाटा देवून यंदाच्या गणेशमूर्तींच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशा पथकांना पसंती दिली आहे. पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांचा हा चांगला परिणाम दिसून येत आहे. त्याव्दारे तरुणांसाठी कमाईचे साधनही उपलब्ध झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT