The toilet at the bus stand in Kharsundi is in a pit of filth 
पश्चिम महाराष्ट्र

खरसुंडीत बसस्थानकातील शौचालय अस्वच्छतेच्या गर्तेत

हमीद शेख

खरसुंडी : येथील एकमेव असणारे बसस्थानकातील शौचालय पूर्णपणे तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात शौचालय (मुतारी) बांधली आहे. पूर्ण गावात वैयक्तिक कुटुंबाचे वगळता इतर ठिकाणी सार्वजनिक कोठेच सोय केलेली नाही. 

गावात इतर ठिकाणी मुतारीची सोय नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक व भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. एकमेव असलेली बसस्थानकातील सोय सर्वांसाठी उपयुक्त ठरते. याचाच वापर भाविकांबरोबर नागरिकही करतात. खरसुंडी हे नामवंत तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. 

गेली आठ ते दहा महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकामधील शौचालयाची साफसफाई करण्यात आलेली नाही. बसस्थानकात कायमस्वरूपी साफ सफाई कामगार कोणी नाही. आटपाडी आगारा मार्फत कधीतरी स्वच्छता करण्यात येते. बसस्थानकातील शौचालयामध्ये स्थानिक नागरिक व काही मद्यपी रिकाम्या बाटल्या याच शौचालयात टाकून देतात. याचा मोठा खच पडलेला आहे. 

आटपाडी बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी या अस्वच्छतेची दखल घेऊन साफ सफाई कामगार स्वच्छतेसाठी पाठवण्याची गरज आहे. गावांमध्येही सार्वजनिक मुतारी बसवण्यासाठी वरचेवर आतापर्यंत चर्चाच झालेल्या आहेत. ठोस असे उपाय नाही. बस स्थानकाच्या परिसरातील नागरिकांचा विचार करता शौचालयाची साफ-सफाई तातडीने करण्याची गरज आहे अन्यथा इतर कोणतेही साथीचे आजार पसरण्याची वेळ लागणार नाही. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT