पश्चिम महाराष्ट्र

खंडोबाची साखळी तोडण्याचा उद्या कार्यक्रम

मंगसुळीतील दसऱयाचे वैशिष्ट्य ; भाविकांची होते गर्दी

रंगनाथ देशिंगकर

उगार खुर्द : मंगसुळी येथील पुरातन प्रसिद्ध व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिरात शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी साखळी तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. येथील दसरा सणाचे हे वैशिष्य आहे. साखळी तुटल्यावर ग्रामस्थ सोने वाटणार आहेत.

गतवर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने नवरात्रोत्सव व दसरा साधेपणाने झाला. यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने मंदिरात नवरात्रोत्सव साजरा झाला. मंदिरात गुरुवारी (ता. 7) घटस्थापना झाली. शनिवार (ता. 9) ते मंगळवार (ता. 12) अखेर घोडा, पालखी प्रदक्षिणा झाल्या. यावेळी भाविक उपस्थित होते. काही भाविक दिवटीसह प्रदक्षिणेत सहभागी झाले होते.

बुधवारी (ता. 13) जागरणाचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी (ता. 15) दसरा साजरा होणार आहे. दसरया दिवशी मंदिरात सायंकाळी पाचच्या दरम्यान घोडा व पालखीच्या जलदगतीने प्रदक्षिणा होणार आहेत. त्यानंतर घोडा, पालखी जवळ असलेल्या मंदिरांना भेटून मंदिरात परत जाणार आहेत. यावेळी मंदिरात भाविकांची गर्दी होते. अश्विन प्रतिपदेपासून साखळी तोडणारे वाघे हे साखळीची पूजा करून उपवास धरतात. ही साखळी देवापुढे ठेवून मानकरी, पुजारी ती तोडण्यासाठी वाघ्यांकडे देतात. साखळी तुटणारया दगडी खांबाला साखळीचे एक टोक बांधून साखळी दगडावर आपण्यास वाघे सुरु करतात. यावेळी भाविकांतून यळकोट यळकोट घे असा नामघोष सुरु होतो. नगारा, चौघड्यासह हलग्यांचा कडकडाट सुरु असतो. साखळी आपटतात, त्यास पेट म्हणतात. साखळी तुटल्यावर तुटलेल्या कड्या व साखळी तोडण्यासाठी दिलेले पेट यांची बेरीज करून येणाऱया सहा महिन्याचा काळ चांगला जाणार असे मानण्यात येते. गतवर्षी दसरया दिवशी एक पेट 5 कडी तर 2019 च्या दसरया दिवशी 166 पेट 6 कडी अशी साखळी तुटली होती. साखळी तुटल्यावर आरती झाल्यावर सोने वाटपास प्रारंभ होतो.

वर्षातून दोनवेळा साखळी तोडण्याची परंपरा

या खंडोबा मंदिरात दसरया दिवशी सायंकाळी व यात्रेदिवशी चैत्र शुद्ध दशमी दिवशी साखळी तोडण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. ही साखळी एक मण वजनाची, पंचधातुची व 27 कड्यांची आहे. ती दसरयादिवशी सुर्यास्ताच्या वेळी व यात्रेदिवशी उत्तररात्री तोडण्याची प्रथा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT