Accident sakal
पश्चिम महाराष्ट्र

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात अनंतपूरमधील शिक्षक जागीच ठार

ट्रॅक्टर-दुचाकी धडकेत अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील कन्नड शाळेतील शिक्षक जागीच ठार झाला.

सकाळ वृत्तसेवा

अथणी : ट्रॅक्टर-दुचाकी धडकेत अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील कन्नड शाळेतील शिक्षक जागीच ठार झाला. जत-उमदी सोलापूर मार्गावर वलसंग येथे शनिवारी (ता. २२) सकाळी हा अपघात झाला. लक्ष्मण बाळू पवार (वय 51, रा. उटगी, ता. जत) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. (Accident Death Of Teacher)

याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मण पवार हे जत तालुक्यातील आपल्या उटगी गावात वास्तव्यास होते. शनिवारी (ता. २२) सकाळची शाळा असल्याने ते अनंतपूरकडे निघाले होते. वलसंगजवळ आल्यावर ट्रॅक्टरने मागून त्यांच्या दुचाकीला जोराने धडक मारली. त्यात पवार हे जागीच ठार झाले. याबाबतची माहिती समजताच शाळेत श्रद्धांजली वाहून बंद ठेवण्यात आली.

जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शासकीय दवाखान्यात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरारी झाला आहे. जत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. अंत्यसंस्कारासाठी अथणीहून गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शैलेश सनदी व शिक्षक उपस्थित होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT