death of a crocodile.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आमणापूर येथे रेल्वेच्या धडकेत मगरीचा दुर्दैवी मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

अंकलखोप (सांगली) -  आमणापूर ( ता. पलूस ) येथे रेल्वे अपघातात मगरीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आमणापूर ते भिलवडी रेल्वे मार्गावर रूळावर आमणापूर रेल्वे स्टेशनपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. 

सध्या या ठिकाणी रेल्वे डबल ट्रॅकचे काम सुरू आहे. त्यासाठी ट्रॅकच्या बाजूला तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. या कुंपणावर दोन्ही पायापासून खालचा भाग तुटून पडलेली मगर येथील मेंढपाळांना आढळली. या मगरीची लांबी सुमारे साडेसहा फुटापर्यंत असण्याची शक्‍यता आहे. तसेच ही मादी मगर फुगलेल्या अवस्थेत पाहायला मिळाल्याने तिचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्‍यता आहे. मृतदेह फुगल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. 

वनविभागाला याची माहिती कळवल्यानंतर परिमंडळ अधिकारी मारूती ढेरे, क्षेत्र अधिकारी शहाजी ठोरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुराज कदम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच पंचनामा केला. 
मगर मृतावस्थेत सापडलेला परिसर कृष्णा नदीपासून चार किलोमीटर अंतरावर आहे. 2005 च्या महापूरापासून या निर्जन परिसरात मगरींचे वास्तव्य दिसून येते. तसेच हा परिसर मगरीच्या प्रजननासाठी उत्तम असल्याचे प्राणी मित्र मोहसीन सुतार यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT