train accident case in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

दैव बलवत्तर म्हणून चिमूकलीचा वाचला जीव; एका क्षणांत झाला असता होत्याच नव्हत

सतिश जाधव

बेळगाव : देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आहे. आज ही म्हण एका चिमुकलीच्या बाबतीत खरी ठरली आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर दैव बलवत्तर म्हणून एका चिमूकलीचा जीव वाचला आहे. एका क्षणाचा जरी उशीर झाला असता तर त्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला असता. 

1 डिसेंबर रोजी हजरत निजामुद्दीन येथून वास्कोला जाणारी गोवा एक्स्प्रेस मद्यरात्री 1.55 च्या सुमारास बेळगाव रेल्वे स्थानकावर आली. काही वेळाने वास्कोकडे मार्गस्थ झाली. इतक्यात एका चिमुकलीने त्यातून खाली उडी घेतली, पुन्हा रेल्वेत चढत असताना, तिचा पाय घसरला. ती डब्याच्या पायऱ्यावर पडल्याने ती फरपटत गेली. ही घटना एका पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या चीमुकलीला बाहेर काढले.

सुदैवाने त्या चिमुकलीला कोणतीही दुखापत झाली नाही. 1 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेचा हा विडिओ शुक्रवारी (ता. 11) शहर परिसरात व्हायरल झाला होता.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT