Trains for the enjoyment of the little ones; Not a single tree was sacrificed 
पश्चिम महाराष्ट्र

लहानांच्या आनंदासाठी रेल्वे; एकाही झाडाचा बळी नाही

बलराज पवार

सांगली : शहरात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी कुठलेही साधन नाही. त्यामुळे आमराई उद्यानात बसवण्यात येणाऱ्या मिनी रेल्वेमुळे बालकांना रेल्वेत बसण्याचा आनंद मिळणार आहे. या रेल्वेमुळे आमराईच्या मूळ रचनेला कसलाही धक्का लागू देणार नाही. आमराईतील एकही झाड यासाठी बळी जाणार नाही असे स्पष्टीकरण नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी दिले. 

नगरसेविका सौ. निंबाळकर म्हणाल्या, माझ्याच प्रभागात आमराई आहे. महापालिकेने आमराईचे सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी सुशोभिकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. आमराई नैसर्गिक उद्यान आहे. तेथे विविध प्रकारची वृक्षराजी आहे. त्यामुळे या ठिकाणी सांगलीकर मोठ्या संख्येने व्यायामासाठी येतात. शिवाय लहान मुलांना घेऊन वनभोजन आणि खेळण्यासाठीही सहकुटुंब नागरिक येत असतात. या लहान मुलांच्या आनंदात भर टाकण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी तेथे उद्यान रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्या म्हणाल्या, या उद्यान रेल्वेसाठी अवघी 250 ते 300 मीटर इतकीच जागा वर्तुळाकार ट्रॅकसाठी लागणार आहे. शिवाय छोटा प्लॅटफॉर्म, उड्‌डाणपूल तयार करण्यात येणार आहे. मात्र त्यामुळे आमराईतील वृक्षराजीला धक्का बसू देणार नाही. तशी अटही ठेकेदासाठी घालण्यात आली आहे. आयुक्तांनीही या मिनी रेल्वेसाठी झाडे काढावी लागणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. आमराईच्या एका बाजूला ही रेल्वे बसवण्यात येईल. त्यामुळे मुलांनाही त्याचा आनंद लुटता येणार आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

Vijay Hazare Trophy मध्येही दिसली 'पांड्या पॉवर'; चौकार - षटकारांची बरसात करत झळकावली शतकं, संघाचाही मोठा विजय

SCROLL FOR NEXT