पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील सात तहसीलदारांच्या बदल्या 

सकाळ वृत्तसेवा

सांगली -  जिल्ह्यातील सात तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या. अन्य जिल्ह्यातून चार तहसीलदार नव्याने दाखल होणार आहेत. चार दिवसांपूर्वी पाच तहसीलदारांच्या बदल्या झाल्या होता. विधानसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर बदल्यांचा धडाका सुरू झालेला आहे. 

मावळचे तहसीलदार रणजित मावळ मिरजेचे तहसीलदार म्हणून रुजू होणार आहेत. मिरजेचे तहसीलदार शरद पाटील यांची जावळी (जि. सातारा) येथील तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. सांगली महसूलचे तहसीलदार योगेश खरमाटे यांची सांगोला येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे.

कवठेमहांकाळच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांची कागलच्या तहसीलदार म्हणून बदली झाली. येथे नव्याने कागलचे तहसीलदार बी. जे,. गोरे रुजू होणार आहेत. कडेगावच्या तहसीलदार श्रीमती अर्चंना शेटे यांची कोल्हापूर निवडणूक शाखेकडे बदली झाली. या ठिकाणी पुण्याहून श्रीमती शैलजा पाटील रुजू होतील. विटा येथे तहसीलदार म्हणून बार्शीचे तहसीलदार हृषीकेत शेळके नव्याने रुजू होतील. 

सांगलीत महसूल तहसीलदार म्हणून शाहूवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप तर सामान्य शाखेत तहसीलदार म्हणून गडहिंग्लजचे तहसीलदार रामलिंग चव्हाण व दौंडचे तहसीलदार बालाजी सोमनाथ रुजू होणार आहेत. सांगलीचे सामान्य शाखेचे तहसीलदार प्रदीप शेलार यांची बार्शीचे तहसीलदार म्हणून बदली झाली. सांगलीच्या तहसीलदार रंजना उंबरहंडे यांची पुणे पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT