railway canceled
railway canceled 
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वेने प्रवास करताय...मुंबई-पंढरपूर अन्‌ मुंबई-विजयपूर रेल्वे रद्द 

तात्या लांडगे

सोलापूर : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मंकी हिल- कर्जत स्थानकादरम्यान अप लाईनवरील तांत्रिक कामामुळे 15 जानेवारीपर्यंत रद्द केलेल्या रेल्वे गाड्या आता 16 ते 20 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबई- पंढरपुर फास्ट पॅसेजर (16 ते 18 जानेवारी), पंढरपुर- मुंबई फास्ट पॅसेजर (17 ते 19 जानेवारी) आणि मुंबई- विजयपूर फास्ट पॅसेंजर (15 ते 20 जानेवारी) या गाड्यांचा समावेश आहे. 


चेगूर येथे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक मेळावा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर 25 ते 31 जानेवारीपर्यंत म्हैसूर-काचिगुडा सुपरफास्ट एक्‍सप्रेस व चेंगलपटू- काचिगुडा एक्‍सप्रेसला शदनगर स्थानकावर एक मिनिटचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. तसेच मुंबई-भुनेश्‍वर कोणार्क एक्‍सप्रेसलाही विकाराबाद स्थानकावर एक मिनिटचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तरी रेल्वे प्रवाशांनी गाडीला तात्पुरता थांबा दिल्याची नोंद घ्यावी व प्रवास सुनिश्‍चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


ठळक बाबी... 

  • विजापुर- मुंबई फास्ट पॅसेजर रेल्वे 15, 16 व 20 जानेवारीला रद्द 
  • दौंड- साईनगर फास्ट पॅसेजर रेल्वे 16 ते 20 जानेवारीपर्यंत रद्द 
  • भुसावळ- पुणे- भुसावळ एक्‍सप्रेस 16 ते 20 जानेवारीदरम्यान व्हाया मनमाड, दौड मार्गे परावर्तीत 
  • चेगूर येथे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक मेळावा होणार 
  • 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत या मार्गावरील गाड्यांना शदनगर व विकाराबाद स्थानकावर तात्पुरता थांबा 

सततच्या बदलांमुळे प्रवासी हतबल 
मागील वर्षभरापासून मंकी हिल- कर्जत असो की भुसावळ, भिगवण, सोलापूर, कलबुर्गी, वाडी या स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंगसह अन्य तांत्रिक अडथळ्यांमुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. अचानक रेल्वे गाड्या रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे कठीण जात आहे. बहूतांश गाड्यांचे मार्ग परावर्तीत केल्याने गाड्यांना संबंधित स्थानकांवर पोहचण्यासाठी विलंब होत आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT