पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या सर्वोपचार रुग्णालयात आता मूळव्याध "ओपीडी'

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : स्पर्धेच्या काळात बदललेली आहार विहार पद्धती, खाण्याच्या वेळात झालेल्या बदलामुळे मूळव्याधाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अशा रुग्णांवरील उपचारासाठी श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) स्वतंत्र ओपीडी सुरू केली जाणार आहे. दर मंगळवार, गुरुवार व शनिवारी ही ओपीडी सुरू राहील, असे नियोजन केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. यामुळे मूळव्याधग्रस्त रुग्णांची सोय झाली आहे. 

रुग्णांचे पोटाचे विकार अथवा अन्य व्याधींची तपासणी दुर्बिणीद्वारे त्याच ठिकाणी केली जाणार आहे. जेणेकरून शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे सोयीस्कर होईल, असेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर शिकाऊ डॉक्‍टरांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयातून महागडे उपचार घेणे शक्‍य होत नाही. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातून त्यांना मोफत उपचार मिळावेत, असे नववर्षात नियोजन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

तीन दिवस सोय
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सध्याच्या ओपीडीशेजारी मूळव्याधावरील रुग्णांची तपासणी करण्याच्या हेतूने नवी ओपीडी सुरू केली जाणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी रुग्णांची तपासणी केली जाईल. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 

ठळक बाबी... 
- आठवड्यातून तीनवेळा दुर्बिणीद्वारे रुग्णांची तपासणी होणार 
- गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रियेची सोय 
- शिकाऊ डॉक्‍टरांना मोफत अत्याधुनिक उपचार पद्धतीचे प्रशिक्षण 

उद्‌घाटनासाठी मंत्र्यांची पाहताहेत वाट 
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र, खाते वाटप झालेले नाही. सर्वोपचार रुग्णालयात नव्याने सुरू होणाऱ्या मूळव्याधावरील ओपीडचे उद्‌घाटन नूतन आरोग्य मंत्री अथवा आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

Water Storage : पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2024

Monsoon : केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून होणार दाखल

Sakal Vastu Expo : स्वप्नातील घर आता सत्यात अवतरणार

SCROLL FOR NEXT