tree
tree 
पश्चिम महाराष्ट्र

अक्कलकोट - स्नेहलोक फौंडेशनच्या वतीने प्रमिला पार्कमध्ये वृक्षारोपण संपन्न 

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरातील  नवीन राजवाडा परिसरातील प्रमिला पार्क उद्यानात स्नेहलोक फौंडेशन आयोजित कार्यक्रमात आज मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते अकरा वृक्ष लावण्यात आले. मागील दहा ते बारा वर्षापासून हे उद्यान दुर्लक्षित होते. पण स्नेहलोक 
फौंडेशनच्या 25 ते 30 तरुण मुलांनी हे उद्यान विकसित करण्याचा निर्धार केला आहे.

प्रत्येकाचा वाढदिवस आणि आयोजित इतर चांगले उपक्रम हे स्वतःच्या खर्चाने आणि सेवाभावी वृत्तीने करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी या संस्थेचे अध्यक्ष काशीराया पाटील यांचा वाढदिवस अक्कलकोटचे मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल यांच्या उपस्थितीत विविध अकरा वृक्षांचे रोपण करून करण्यात आले.यावेळी बोलताना ठेंगल म्हणाले की या संस्थेचे उपक्रम हे अनुकरणीय असून इतर सेवाभावी संस्थांनी यांचा आदर्श घ्यावा आणि यापुढे शहर हिताच्या चांगल्या कामाला नगरपरिषद सर्व सहकार्य करेल.

प्रमिला पार्क उद्यान परिसराचे स्वछता अभियान आणि वृक्षारोपण अश्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून तरुणात एक वेगळा संदेश देऊ केला आहे. पण एवढ्यावरच न थांबता ही तरुण मुले येत्या आठवड्यात वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळणी,पिण्याचे पाणी,विजेची सोय आदी व्यवस्था करण्याचा संकल्प आज या युवकांनी केला आहे.पण ही सर्व कामे अक्कलकोटच्या स्नेहलोक युथ फौंडेशनची मित्रमंडळी यांनी तांत्रिक बाबी विचारात घेऊन स्वखर्चाने आणि वाया जाणारे वस्तू उपयोगात आणून परिसरातील नागरिकांची सोय या उपक्रमातून करीत आहेत हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.या बागेतील वृक्षांना स्वतः पाणी उपलब्ध करून देण्याचा निश्चय बागे शेजारी राहणारे धायगुडे यांनी केला आहे. यावेळी अध्यक्ष काशीराया  पाटील, उपाध्यक्ष सचिन कालीबत्ते, शिवराज  स्वामी,समीर मणियार,दत्तात्रय कवठे,अंकुश चौगुले, सिद्धाराम कालीबत्ते, धर्मराज भोसगी, भीमाशंकर  वग्गे , अक्षय मंगरुळे, सागर माळाबगी, शिवू हिप्परगी, चरण धरणे, प्रमोद धनशेट्टी,रोहित तेल्लूणगी, राहुल तेलूणगी, सिद्धाराम अस्वले ,राहुल वग्गे, गंगाराम पवार,आनंद देसाई, सिद्धाराम निंबाळ,महेश शेडम,राकेश कापसे, चन्ना फताटे, शरणय्या मसुती, सागर भडोळे, समर्थ गोरे, मल्लिनाथ भासगी, नागनाथ अमोगी, संतोष स्वामी, सिद्धार्थ पाटील, गुरु हिरेमठ, विशाल निंबाळ, चंद्रकांत पाटील, पिंटू जाधव, किरण पोतदार आदींची उपस्थिती होती.

मागील पंधरा दिवसापासून या तीस तरुणांनी दररोज तीन तास श्रमदान करून बागेतील प्रचंड वाढलेले  गवत काढून झुडुपे तोडली आहेत.याशिवाय पूर्ण बाग अगदी चकाचक करून त्यात असणाऱ्या झाडांना मध्यापर्यंत रंग दिलेले आहेत.तसेच वाया गेलेली वाहनांची टायर वापरून त्यांना रंग देऊन लोकांना बसायला जागा केलेली आहे.नवीन वृक्ष लागवड केली आहे.त्या ठिकाणी पूर्वी असलेली लोखंडी खेळणी गंजली होती त्याला दुरूस्त करून रंग देण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT