truck 
पश्चिम महाराष्ट्र

ट्रक धावतील ओ, पण आधी....

सकाळवृत्तसेवा

सांगली ः येत्या 20 एप्रिलनंतर देशात मालवाहतूकीला मोकळीक दिली गेली आहे. देशभरात "चक्काजाम' असलेले काही लाख ट्रक, टेम्पो रस्त्यावर धावायला लागतील.

परंतू, त्यासाठी आधी गावोगावी अडकलेले ट्रकचे चालक मूळ वाहन तळापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्या चालकांना आधी प्रवासाची परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्हा वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्ह्यात लहान-मोठी मालवाहतूकीची दहा हजारावर वाहने आहेत. त्यातील फक्त एक हजारावर वाहने अत्यावश्‍यक सेवा देण्यासाठी धावताहेत. बाकी नऊ हजार वाहने थांबून आहेत. ती आता धावती होतील. सांगलीतून मोठ्या प्रमाणात साखर, भाजीपाला, फळे आणि द्राक्ष, बेदाण्याची वाहतूक देशभर सुरु होईल, असे अपेक्षित आहे. त्याचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी वाहतूकदार संस्थेचे कार्यालय सुरु राहणे आणि तेथील सर्व कर्मचारी कामावर हजर होणे महत्वाचे आहे. त्यालाही मान्यता मिळावी, अशी संघटनेने मागणी केली आहे.

""वाहनाचे चालक, हेल्पर, लोडर, अनलोडर सारेच जीवावर उदार होऊन काम करणार आहेत. देशभर जाणार आहेत. पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची सेवा अत्यंत महत्वाची आहे. तशीच या वाहतूकदारांची असेल. त्यामुळे त्यांनाही सुरक्षिततेसाठी कोविडचा जीवन विमा मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.''

बाळासाहेब कलशेट्टी,
अध्यक्ष, जिल्हा वाहतूकदार संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : ३०० लोक रद्द, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी कामे

SCROLL FOR NEXT