atm
atm 
पश्चिम महाराष्ट्र

हातोडा, छन्नीने फोडले एटीएम.. पण पैसे नाही निघाले! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सुरक्षा रक्षकाला पकडून चाकुचा धाव दाखवून कोपऱ्यातल्या खोलीत डांबले. हातोडी आणि छन्नीने मारून एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. धडपड करूनही यश येत नसल्याने दोघा चोरट्यांनी पळ काढला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास कुंभार वेस परिसरातील आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. 

सुरक्षा रक्षक घनश्‍याम राजन भोसले (वय 24, रा. म्हाडा कॉलनी अष्टविनायक नगर, जनता बॅंकेच्या शेजारी, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. कुंभारवेस येथील आयसीआयसी बॅंकेच्या एटीएममध्ये घनश्‍याम भोसले हे ड्युटीवर होते. पाऊस येत असल्याने एटीएम सेंटरचे शटर अर्धवट बंद करून भोसले हे आतमध्ये मोबाईलवर चित्रपट पाहत होते. दोन अनोळखी व्यक्ती रविवारी पहाटे दीडच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये घुसले. तोंडावर मास्क लावलेल्या तरुणाने हातातला चाकू भोसले यांच्या गळ्याला लावला. तेरेसे कुछ लेना देना नही, आवाज किया तो खल्लास कर देंगे असे म्हणून धाक दाखवून कोपऱ्यातला खोलीत बसविले. तोंडावर रुमाल बांधलेल्या तरुणाने हातोडा व छन्नीने मशीन फोडले. कॅश डोअर उघडता आले नाही. धडपड करूनही रोकड निघाली नाही, शेवटी दोघेही बाहेर थांबलेल्या तिसऱ्या साथीदारासह पळून गेले.

बाहेर पडल्यानंतर दोघांनी कन्नड भाषेत संवाद साधल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षक भोसले यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलीस उपनिरीक्षक देवदत्त गोडसे तपास करीत आहेत. 

आयसीआयसीआय बॅंकेकडून एटीएम मशीनला असलेल्या कॅमेऱ्यातून चित्रीकरण मिळण्याची शक्‍यता आहे. पोलिसांनी याप्रकरणातील चोरट्यांच्या शोधाला वेग दिला आहे. 
- यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT