belgao 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न

संजय सूर्यवंशी

बेळगाव : गोवावेस मधील दत्त मंदिरासमोरील शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी शटर उचकटून आतील बाजूस असलेला काचेचा दरवाजा फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु फुटलेल्या काचा त्यांना लागल्याने ते परत निघून गेले. बाजूला असलेल्या प्लायवूडच्या दुकानाचे शटरही उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला आहे. या दोन्ही घटना आज सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आल्या. 

गोवावेसला शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह  लिमिटेड बँकेची शाखा आहे. आज सकाळी येथून येणाऱ्या जाणाऱ्यांना बँकेचे शटर काही फूट उघडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा याठिकाणी शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शटर वरती करून आतील बाजूस असलेल्या अर्ध्या भिंतीच्या आतील काचेचा दरवाजा फोडला. त्यातून आत जाण्याचा प्रयत्न करताना बहुदा चोरट्यांना काचा लागल्या असाव्यात. कारण त्या ठिकाणी रक्त पडल्याचे दिसून येते.  त्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला. याच्याच खालील बाजूला प्लायवूडचे नव्याने दुकान होत आहे. याचेही शटर उचकटण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आह. घटनेची माहिती मिळताच गुन्हे विभागाचे  डीसीपी महानिंग नंदगावी टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक मौनेश देशनुर  व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT