पश्चिम महाराष्ट्र

पट्टणकोडोली बिरदेव यात्रेत भंडाऱ्याऐवजी हळद

सचिनकुमार शिंदे

पट्टणकोडोली - महाराष्ट्रासह पाच राज्यांत प्रसिद्ध असणाऱ्या विठ्ठल बिरदेव यात्रेत भंडारा ऐवजी हळद वापरण्याचे देवस्थान समितीने ठरवले आहे. यामुळे या वर्षी भाविकांना खर्च वाढणार असला तरी शरीरांवर कोणताही अपाय होणार नाही.  

येत्या रविवार (ता.२८) पासून येथील विठ्ठल बिरदेव  यात्रा सुरू होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या बरोबरच पाच राज्यांतून लाखों भाविक दाखल होतात. भाविक वर्गाकडून देवाला भंडारा उधळण्यासाठी नवस बोललेला असतो. ‘मूल होऊ दे मुलाच्या वजना इतका भंडारा उधळतो’, मी अमुक  इतक्‍या रकमेचा भंडारा उधळतो. आणि तशा नवसाप्रमाणे लोक उधळतात. यामुळे या यात्रेत टनाच्या हिशेबात भांडाराचा खचच्या खच पडलेला असतो.

भंडाऱ्यामध्ये मातीचे प्रमाण जास्त असल्याने भंडारा डोळ्यात गेल्याने कचकचणे, डोळे लाल होणे. अंग चिकट होणे, घामाने अंगावरील भंडाऱ्याचे वगळ येणे अशा गोष्टी होत असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र देवाच्या प्रेमापोटी भाविक या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून भंडाऱ्यात न्हाऊन निघत होते. देवस्थान समितीने भंडाऱ्याऐवजी हळद वापरता  येईल का याबाबत थोडा अभ्यास केला. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या हळदीमुळे कोणताही त्रास होत नाही. उलट हळदीने न्हाऊन निघाल्यामुळे भाविकांच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. भाविकांनी हळद खाल्ल्यानंतरही अपाय होत नाही. यामुळे भंडाऱ्याऐवजी हळद वापरण्याचे आवाहन यात्रा समितीने केले आहे.

देवस्थान समितीने ठरवल्याप्रमाणे आम्ही भाविकांच्यासाठी हळदीची पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे बाहेरगावांहून येणाऱ्या व्यापारीवर्गानेही हळदीचीच विक्री करावी. यासाठी लागेल तेवढी हळद उपलब्ध करून ठेवलेली आहे.
- बाळासाहेब तेली, 

 होलसेल विक्रेते, पट्टणकोडोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT