APMC.JPG 
पश्चिम महाराष्ट्र

"लॉकडाऊन' काळातही एवढ्या कोटींची उलाढाल 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाऊन' सुरू झाल्यापासून 24 मार्च ते 24 एप्रिल कालावधीत विविध मालाची 46.44 कोटीची उलाढाल झाली आहे. गुळाच्या 300 गाड्या मुंबई, गुजरातला गेल्या आहेत. 


सद्य:स्थितीमध्ये सांगली बाजार समितीमध्ये नियमितपणे गहू, ज्वारी, तांदूळ, खाद्यतेल व डाळींची आवक होत आहे. त्यामुळे मागील एक महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अत्यावश्‍यक घटकांची कमतरता भासलेली नाही. वैयक्तिक खरेदीदारास बाजार समिती आवारात येण्यासाठी प्रतिबंध केला असून केवळ रिटेल दुकानदार येऊ शकतात. शारिरीक अंतर राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. 


बाजार समितीमध्ये काही दिवसांमध्ये हळद येण्यास सुरवात होईल. उघड लिलाव केल्यास सामाजिक अंतर राखले जाऊ शकणार नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समिती आवारामध्ये उघड पद्धतीने लिलाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे. या ठिकाणी होणारे हळदीचे लिलाव ऑनलाईन पद्धतीने कराण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 28 एप्रिलपासून बाजार समितीमध्ये हळदीचे ऑनलाईन लिलाव सुरू होणार आहेत. तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन केले आहे. 


लॉकडाऊनच्या काळातही 46.44 कोटी उलाढाल- 
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 24 मार्च ते 24 एप्रिल कालावधीत गुळाच्या 300 गाड्या मुंबई, गुजरातला गेल्या आहेत. त्याचप्रमाणे इतर मालाची विक्री व उलाढाल अशी : गहू - 21480 क्विंटल, उलाढाल-554.80 लाख, तांदूळ - 11330 क्विंटल, उलाढाल - 482.24 लाख, चना डाळ - 4306 क्विंटल, उलाढाल - 261.84 लाख, मसूर डाळ - 5024 क्विंटल, उलाढाल - 421.64 लाख, मूगडाळ - 2865 क्विंटल, उलाढाल - 271.41 लाख, तूरडाळ - 2704 क्विंटल, उलाढाल - 196.21 लाख, साखर - 3238 क्विंटल, उलाढाल - 125.96 लाख, खाद्यतेल - 1827 क्विंटल, उलाढाल -200.93 लाख, मीठ - 1448 क्विंटल, उलाढाल - 14.48 लाख, इतर धान्य मसाले - 39689 क्विंटल, उलाढाल - 1956 लाख, गुळ - 4650 क्विंटल, उलाढाल - 158.22 लाख, अशी एकूण 98561 क्विंटल विक्री व 4644.54 लाख रुपये इतकी उलाढाल झाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'लिव्ह इन' पासून घरातील धान्यापर्यंत! जनगणनेदरम्यान विचारले जाणार ३३ प्रश्न, ऑनलाइन माहिती भरण्याचीही सुविधा...

Patas Sugar Factory: पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग; ट्रक जळून खाक, अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचली अन्..

Crime News : आणखी एक श्रद्धा ! नौदलाच्या अधिकाऱ्याने वादानंतर प्रेयसीची केली हत्या, तुकडे करुन फ्रिजमध्ये लपवला मृतदेह

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

Claude Mythos Leak : सायबर कंपन्यांना धक्का! AI क्लॉड मिथोस लीकमुळे शेअर मार्केट कोसळले; एका दिवसात १४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान

SCROLL FOR NEXT