Tushar Gandhi statement set up counter government again politics  sakal
पश्चिम महाराष्ट्र

पुन्हा प्रतिसरकार स्थापण्याची वेळ - तुषार गांधी

तुषार गांधी : क्रांतिवीर नागनाथअण्णांना जयंतीदिनी अभिवादन

सकाळ वृत्तसेवा

वाळवा, (जि.सांगली) : देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता स्वतंत्र भारतात पुन्हा एकदा प्रतिसरकार स्थापन करायची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले. राष्ट्रहितासाठी राजद्रोह करण्याची हिंमत असणारी फौज तयार झाली पाहिजे, अन्यथा भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या मैदानात भर पावसात मोठ्या गर्दीत कार्यक्रम झाला. हुतात्मा उद्योगसमूहाचे नेते वैभव नायकवडी, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, डॉ. बाबूराव गुरव, ॲड. सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, के. जी. पाटील विचारमंचावर उपस्थित होते.

डॉ. गांधी म्हणाले, ‘‘क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या भूमीवर नतमस्तक होण्याचे भाग्य मला लाभले. अण्णांनी घालून दिलेल्या मार्गावरील वाटचाल हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. देशातील भयानक राजकीय परिस्थिती पाहता अण्णा आज असते तर त्यांनी पुन्हा प्रतिसरकार स्थापन केले असते. सामाजिक अधिकार, समता, बंधुता आणि न्यायासाठी लढणाऱ्यांना आज तुरुंगात डांबले जाते. भीमा कोरेगाव प्रकरणात हेच झाले. लोकशाहीत मनमानीला जागा नाही, मात्र आपल्या आंधळेपणाने लोकशाहीची उघडपणे थट्टा केली जात आहे.’’

वैभव नायकवडी म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहिताना प्रतिसरकारचे काम टाळता येणार नाही. अण्णांची जयंती साजरी करताना देश आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतो, हा विचार मनात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.’’

ही लोकशाहीची चेष्टाच’

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर तुषार गांधी यांनी चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, ‘‘काय झाडी, काय डोंगर... ही लोकशाहीची सर्वांत मोठी चेष्टा आहे. त्यांना आपल्या मतांनी ताकद दिली. त्यामुळे आपणास शरम वाटली पाहिजे की, आपण असे ऐयाश लोक निवडून दिले. राज्यात जे घडले, त्यात राज्य आणि जनतेच्या हिताचे धोरण नव्हते. विचारांचा संबंध नव्हता. केवळ स्वार्थ साधण्यासाठी ते घडले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT