Twelve reports of Manikdondi negative 
पश्चिम महाराष्ट्र

सुटलो बुवा...माणिकदौंडीचे १२ रिपोर्ट निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी: मरकजहून आलेल्या तालुक्‍यातील माणिकदौंडीतील व्यक्तीसह कुटुंबातील "त्या' बारा सदस्यांचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत. माणिकदौंडीत शुक्रवारी दुपारी दिल्लीतील मरकजहून परतलेला एक तरुण आढळून आला. त्यामुळे तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली.

याबाबत नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय जायभाय यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी माणिकदौंडीत संबंधित तरुणाच्या घरी जाऊन चौकशी केली होती. त्या वेळी या तरुणाने मरकजहून आल्याचे कबूल केले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित तरुणासह त्याच्या संपर्कात आलेल्या बारा सदस्यांना शुक्रवारी दुपारी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यासाठी दाखल केले होते.

रविवारी सायंकाळी त्यांचे अहवाल आले. त्यात ते "निगेटिव्ह' असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. मात्र, त्या सर्वांना पुढील चौदा दिवसांसाठी "क्वारंटाईन' करण्यात येण्याची शक्‍यता आहे. 
शनिवारी संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील आणखी तिघांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती मिळाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT