Twenty thousand warriors of Zilla Parishad are fighting against Corona 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाविरूद्ध लढताहेत जिल्हा परिषदेचे २० हजार वॉरिअर्स

दौलत झावरे

नगर ः कोरोनाविरोधात जिल्हा परिषदेतील आरोग्य, ग्रामपंचायत, अंगणवाडी, आशा सेविका असे सुमारे 20 हजार कर्मचारी राबत आहेत. जनजागृतीसह नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारीपासून कोरोनाबाबत खबरदारी व उपाययोजना आखण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा प्रशासनाच्या बरोबरीने तेव्हापासून मैदानात उतरली आहे. मार्चमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यापासून जिल्हा परिषद आस्थापनेतील ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, आशा, आरोग्य, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदींसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कर्मचारी उपाययोजना करीत आहेत. 

शहरातून मोठ्या संख्येने लोकांचे लोंढे ग्रामीण भागात येत असून, आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांच्या हातावर "होम क्वारंटाईन'चे शिक्के मारले आहेत. हे काम ग्रामपंचायत, अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांनी चोख केले आहे. शाळा, मंगल कार्यालयांत या लोकांची राहण्याची, तसेच जेवणाची व्यवस्था ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत गावोगाव स्वच्छता ठेवण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांनीही आता विमाकवच देण्याची मागणी केली आहे. 

कोरोना निर्मूलनासाठी कार्यरत कर्मचारी 
गटविकास अधिकारी-14, विस्तार अधिकारी-37, ग्रामसेवक-829, ग्रामविकास अधिकारी-217, त्यांचे सहायक-4831, ग्रामपंचायत कर्मचारी-3933, आपलं सरकार कर्मचारी-898, अंगणवाडीसेविका- 5291, मदतनीस-4397, आशा-3183, तालुका आरोग्य अधिकारी-14, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, साथरोग वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका- 500, आरोग्य सेवक-250, सफाई कामगार-42, औषध निर्माण अधिकारी- 84, आरोग्य सहायक (पुरुष) - 122, आरोग्य सहायक (महिला)-90, आरोग्य पर्यवेक्षक- 12, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-11, कुष्ठरोग तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी गट अ/ब- 206. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Latest Marathi News Live Update : पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का; माजी नगरसेवक विशाल तांबे यांचा राजकारणातून संन्यास

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

१०० कोटींचा सिनेमा, अभिनयात दिली जिनिलियाला टक्कर, आता 'वेड' फेम अभिनेत्रीला मिळत नाहीये काम, म्हणते- दुसरा पर्याय...

SCROLL FOR NEXT