Twenty years imprisonment for a minor girl
Twenty years imprisonment for a minor girl 
पश्चिम महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास वीस वर्षांची शिक्षा 

पोपट पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) : येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार मुरादअली मुहब्बत हासमी (वय 31, मूळ श्री दत्तगंज, ता. बालरामपूर, उत्तरप्रदेश सध्या इस्लामपूर) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी हा निकाल दिला. 20 वर्षे सश्रम कारावास, 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष कारावास, बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी 3 वर्षे व 500 रुपये दंड अशी ही शिक्षा आहे. 

याबाबतची माहिती अशी, की नोव्हेंबर 2018 मध्ये येथील संभूआप्पा उरुसात मुरादअली मूहबाबत हासमी पीडित मुलीच्या वडिलांकडे स्टॉलमध्ये काम करीत होता. त्याची पीडित मुलीशी ओळख झाली.

त्याचा गैरफायदा घेत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. बदनामीची धमकीही दिली. पीडित मुलगी गरोदर राहिली. 

यानंतर पीडितेने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुरादअली मूहबाबत हासमी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकील शुभांगी व्ही. पाटील यांनी युक्तिवाद केला. आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पंच, वैद्यकीय अधिकारी व तपासणी अंमलदारांची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT