पश्चिम महाराष्ट्र

सांगली : ढालगावच्या दोघा दुचाकी चोरट्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

सांगली - चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी सांगलीत आलेल्या ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील कादीर अस्लम मणेर (वय 23, ग्रामपंचायतजवळ), असिफ अमिन मुजावर (वय 19, अभिजीत हॉटेलमागे) या दोघांना "एलसीबी' च्या पथकाने
अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अधिक माहिती अशी, जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून ते उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनिषा डुबुले यांनी "एलसीबी' ला आदेश दिले आहेत. त्यानुसार "एलसीबी' चे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी खास पथक तयार केले.

या पथकामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवले जात आहेत. विशेष पथक सांगलीत पेट्रोलिंग करत असताना कादीर व असिफ हे चोरीची दुचाकी विक्रीसाठी शंभर फुटी रस्त्यावरील व्हाईट हाऊससमोर येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार अशोक डगळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दोघांच्याकडे दोन दुचाकी मिळाल्या. कसून चौकशी केल्यानंतर एक दुचाकी विश्रामबागमधून तर दुसरी मिरजेतून चोरल्याची कबुली दिली.

दोघांकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. त्यांना विश्रामबाग पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केले आहे. "एलसीबी' चे कर्मचारी श्री. डगळे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, वैभव पाटील, राहुल जाधव, संदीप पाटील, सलमान मुलाणी, संकेत कानडे, पवन सदामते, अमोल क्षीरसागर, सचिन कोळी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT