पश्चिम महाराष्ट्र

दोन कोटी भाविकांकडून अंबाबाईचे ऑनलाईन दर्शन

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांसाठी संकेतस्थळ आणि 
मोबाईल ॲप्लिकेशन बनविले आहे. यावर देवीच्या आरतीचे, पूजेचे थेट प्रक्षेपण केले जाते. वर्षभरात सुमारे एक कोटी ८३ लाख ४७ हजार ४३८ भाविकांनी देवीचे थेट प्रक्षेपण पाहिले आहे. यातील सुमारे ७० लाख भाविक परदेशातील असून, कॅनडामधील भाविकांची संख्या सर्वाधिक आहे.

कोणतेही क्षेत्र असे उरले नाही, की ज्याला तंत्रज्ञानाचा स्पर्श झाला नाही. शिक्षण, आरोग्य, बॅंकिंग याबरोबरच धार्मिक क्षेत्रातही तंत्रज्ञानाची कमाल पाहायला मिळते. सहा वर्षांपूर्वी येथील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संकेतस्थळाची निर्मिती केली. यावर अंबाबाई मंदिराच्या माहितीसह दर्शन व्यवस्था, मार्ग या सर्वांचीच माहिती दिली आहे. याशिवाय, अंबाबाईच्या दर्शनाची सुविधा आहे.

देवीच्या गाभाऱ्यातील थेट प्रक्षेपण या संकेतस्थळावर दाखविले जाते. त्यामुळे भाविकांना दिवसभरातील सर्व पूजा पाहता येतात. बरेच भाविक देवीचे ऑनलाईन दर्शनही घेतात. यात परदेशी भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. काही भाविकांना वारंवार ऑनलाईन दर्शन घेतल्यावर देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा होते. असे भाविक आवर्जून कोल्हापुरात येतात.

अंबाबाई मंदिराच्या व्यवस्थापनाबरोबरच भाविकांना सुविधा पुरविणे हे देवस्थान समितीचे कर्तव्य आहे. ऑनलाईन दर्शनामुळे ज्यांना मंदिरात येणे शक्‍य नाही, त्यांना घरबसल्या देवीचे दर्शन होते. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढली असून, ही बाब सुखावणारी आहे. 
- विजय पोवार
(सचिव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती)

देवीचे दर्शन घेऊन देवस्थान समितीच्या कार्यालयात जातात व ऑनलाईन दर्शनाची सुविधा दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानतात. 

अमेरिकेतील विवेक गुप्ता, कुमार, ऑस्ट्रेलियाच्या मीरा विजयन हे देवस्थान समितीच्या कार्यालयात आभार मानण्यासाठी आले होते. ज्या प्रकारे ऑनलाईन दर्शन घेतले जाते, तसेच ऑनलाईन देणगीही देता येते. गेल्या वर्षभरात सुमारे २५ लाख रुपयांची देणगी देवस्थानच्या खात्यात जमा झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT